Numerology | बुद्धिमान असूनही ‘या’ अंकांच्या व्यक्तींना मिळत नाही यश, संपूर्ण आयुष्यच संघर्षमय

अंकशास्त्र (Numerology ) हे ज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. याला सामान्यतः न्युमेरोलॉजी असे म्हणतात. ज्याप्रमाणे 12 राशी चिन्ह काही ग्रहांशी संबंधित आहेत, त्याचप्रमाणे अंकशास्त्रातील 9 अंक हे देखील ग्रहांशी संबंधित आहेत.

Numerology | बुद्धिमान असूनही 'या' अंकांच्या व्यक्तींना मिळत नाही यश, संपूर्ण आयुष्यच संघर्षमय
Numerology

मुंबई : अंकशास्त्र (Numerology ) हे ज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. याला सामान्यतः न्युमेरोलॉजी असे म्हणतात. ज्याप्रमाणे 12 राशी चिन्ह काही ग्रहांशी संबंधित आहेत, त्याचप्रमाणे अंकशास्त्रातील 9 अंक हे देखील ग्रहांशी संबंधित आहेत. प्रत्येक अंकाचा स्वामी हा एखादा ग्रह आहे. अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जोडून जो अंक प्राप्त होतो त्याला मुलांक असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 25 असेल तर 2 आणि 5 यांची बेरिज केली जाईल. त्यातून 7 हा अंक मिळेल याला मुलांक मानले जाईल (Numerology Three Moolank Who Are Very Brilliant But Still Didn’t Get Success In Life).

मान्यता आहे की या मुलांकच्या आधारे लोकांचा स्वभाव आणि त्यांच्या भविष्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, अंकशास्त्रात तीन अंक असे मानले गेले आहेत, जे अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धिचे आहेत, परंतु तरीही त्यांचे जीवन संघर्षपूर्ण करते आणि ते सहजपणे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जाणून घेऊ ते तीन अंक कुठले

3 –

3, 12, 21 आणि 30 या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक 3 असतो. या अंकांचा स्वामी गुरु बृहस्पती आहे. या कारणास्तव, या अंकाच्या लोकांना अत्यंत हुशार मानले जाते. या मुलांकचे लोक खूप हुशार, गुणवंत आणि सक्षम असतात. पण तरीही त्याच्या कारकीर्दीत अनेक अडथळे येतात. यापैकी बहुतेक लोक कौटुंबिक समस्यांमधे अडकलेले असतात. या लोकांच्या जीवनात अपघात आणि दुर्घटना होण्याची भीती असते.

4 –

4, 13, 22, 31 या तारखांना जन्मलेल्या लोकांना मुलांक 4 असतो. या अंकाचा स्वामी राहू आहे. या अंकाचे लोक अत्यंत हुशार असतात. पण, त्यांचे आयुष्य चढउतारांनी भरलेले असते. त्यांना काहीही मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. बर्‍याच वेळा, कठोर परिश्रम घेतल्यानंतरसुद्धा ते आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचू शकत नाहीत. हे लोक बरेच रहस्यमयी असतात, त्यांना ओळखणे फार कठीण असते.

8 –

8, 17, 26 या तारखांना जन्मलेल्या लोकांना मुलांक 8 असतो. 8 या अंकांचा स्वामी शनिदेव आहे. या अंकाचे लोक बुद्धिमान असतात आणि खूप मेहनती असतात. परंतु कठोर परिश्रम करुनही त्यांना हवं असलेलं यश मिळत नाही. या व्यतिरिक्त या लोकांची आयुष्यात अनेकदा फसवणूक केली जाते. यामुळे बर्‍याच वेळा या लोकांमध्ये निराशेची भावना निर्माण झालेली असते.

Numerology Three Moolank Who Are Very Brilliant But Still Didn’t Get Success In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI