AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur wari 2022: इंदापूर नगरीतील मुक्कामानंतर तुकोबारायांची पालखी सराटी गावासाठी मार्गस्थ

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा (Tukaram maharaj palkhi 2022)  हा इंदापूर शहरातील दोन दिवसांचा मुक्काम आटपून सराटी या गावी मार्गस्थ झाला आहे. तुकोबांचा पालखी सोहळा हा इंदापूर तालुक्यात सहा दिवस असतो, शहरात पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी होता. आज या पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी या गावी असून उद्या पालखी सोलापूर जिल्ह्यात […]

Pandharpur wari 2022: इंदापूर नगरीतील मुक्कामानंतर तुकोबारायांची पालखी सराटी गावासाठी मार्गस्थ
| Updated on: Jul 04, 2022 | 1:38 PM
Share
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा (Tukaram maharaj palkhi 2022)  हा इंदापूर शहरातील दोन दिवसांचा मुक्काम आटपून सराटी या गावी मार्गस्थ झाला आहे. तुकोबांचा पालखी सोहळा हा इंदापूर तालुक्यात सहा दिवस असतो, शहरात पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी होता. आज या पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी या गावी असून उद्या पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आला आहे. या सोहळ्यसाठी 15 ते 20 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांची सुरक्षा ही महत्त्वाची मानल्या जाते. या पार्श्वभूमीवर पंढरपूचे पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. याबद्दल पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी TV9 मराठीला माहिती दिली.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त आलेला आहे. यामध्ये 250 पोलीस अधिकारी आणि 5 हजार पोलीस अंमलदार होमगार्ड पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा, वाळवंट आणि इतर महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. चोरीच्या घटनांना आला घालण्यासाठी 154 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.याशिवाय वारकऱ्यांच्या वेशात पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. यामुळे चोरीच्या घटनांना आला घालता येईल. यावेळी पोलीस प्रशासनाकडून 12 माउली स्क्वॉड पंढरपुरात ठेवण्यात येणार आहेत. एका माउली स्क्वॉडमध्ये 10 कर्मचारी असतील.  मंदिर परिसरात दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक तेथेच स्तब्ध उभे राहतात. माउली  स्क्वॉडद्वारे मार्ग मोकळा करण्यात येईल, त्यामुळे रांगेतल्या इतर भाविकांना लवकर दर्शन घेता येणे शक्य होईल.  महाराष्ट्राचे नवीन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे महापूजेसाठी येणार आहेत या अनुषंगाने विशेष सुरक्षा टाईन्ड मारण्यात येणार आहे. या शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत येणाऱ्या इतर मंडळींसाठी विशेष बसची व्यवस्था देखील करण्याचा विचार असल्याचे पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.