Pitru Paksha 2025: पितृपक्षात चुकूनही करु नका ‘ही’ 3 कामे, भोगावे लागतील अत्यंत वाईट परिणाम
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा काळ हा 15 दिवसांचा काळ असतो. या दिवसांमध्ये काही अशी कामं आहेत, जी करणं टाळलं पाहिजे... असं मानलं जातं की, पितृपक्षाच्या काळात काही कामे केल्यामुळे त्रिदोष लागतो... आज जाणून घेऊ 'ती' कोणती कामं आहेत, ज्यामुळे त्रिदोष लागू शकतो...

Pitru Paksha 2025: पितृपक्षाला हिंदू धर्मात सर्वात पवित्र काळ मानला जातो. या काळात, प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजांचे स्मरण करते आणि श्राद्ध, तर्पण आणि दान करतो, जेणेकरून पूर्वजांचे आत्मे आनंदी होतील आणि त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतील. शास्त्रात स्पष्ट म्हटलं आहे की, पूर्वजांच्या समाधानाशिवाय कोणतंही कर्म पूर्ण मानलं जात नाही. परंतु या पितृपक्षात काही चुका आहेत ज्यामुळे त्रिदोष (देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण) निर्माण होतात. जर या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर मुलं होण्यात अडथळे येऊ शकतात, कुटुंब वाढविण्यात अडथळा येऊ शकतो आणि घरात आणि कुटुंबात अशांतता निर्माण होऊ शकते.
त्रिदोष म्हणजे काय?
त्रिदोष म्हणजे तीन प्रमुख ऋणे जी प्रत्येक मानवाला त्याच्या आयुष्यात फेडावी लागतात. पहिलं देवऋण म्हणजे देव आणि निसर्गाचे ऋण, दुसरं म्हणजे ऋषऋण म्हणजे वेद-शास्त्रे आणि ज्ञान देणाऱ्या ऋषींचे ऋण आणि तिसरं म्हणजे पितृऋण म्हणजे पूर्वजांचे ऋण. जर एखाद्या व्यक्तीने हे तीन ऋण पाळले नाही किंवा चुकीचं वर्तन केलं तर जीवनात त्रिदोष निर्माण होतो, ज्यामुळे संतती प्राप्तीमध्ये समस्या, आर्थिक संकट आणि मानसिक त्रास वाढतो.
पितृपक्षात ‘ही’ 3 कामे कधीच करु नका…
पितृपक्ष हा शोक आणि स्मरणाचा काळ मानला जातो. या काळात लग्न, गृहप्रवेश, मुंडन किंवा कोणतेही शुभ कार्य अशुभ मानले जाते. असं मानलं जातं की यामुळे पूर्वज दुःखी होतात आणि कुटुंबाच्या वाढीस अडथळा येतो.
धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात मीठ, मोहरीचं तेल आणि झाडू खरेदी करणं अशुभ आहे. या वस्तूंच्या देवाणघेवाणीने घरात गरिबी आणि रोगराईचा प्रवेश होतो. असं मानलं जातं की ते थेट पितृदोष वाढवतं आणि संतती होण्यात अडथळे निर्माण करते.
या काळाच सात्त्विक जीवनशैलीचं पालन करा… या काळात मांसाहार, मद्य करणं हे पूर्वजांचा अपमान मानलं जातं. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला वेदना होतात आणि मुलांच्या आनंदात अडथळे येतात.
