Pradosh Vrat : आज प्रदोष व्रत, अशाप्रकारे करा महादेवाची उपासना, होतील सर्व मनोकामना पूर्ण

धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर, मंदिरात जा किंवा घरी भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा आणि त्यांची खऱ्या मनाने पूजा करा. शिव चालिसाचा पाठ केल्यानंतर भगवान शिव किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान करावे. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान करून दूध, दही, तूप, मध आणि साखर, तांदूळ आणि खीर अर्पण करावी.

Pradosh Vrat : आज प्रदोष व्रत, अशाप्रकारे करा महादेवाची उपासना, होतील सर्व मनोकामना पूर्ण
प्रदोष व्रत Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 7:04 PM

मुंबई : शिवभक्तांना समर्पित प्रदोष व्रताची पूजा आज होणार आहे. त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत (Pradosh Vrat) भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी पाळले जाते. प्रदोष व्रतात भगवान शिवाची पूजा केली जाते, परंतु यावेळी प्रदोष व्रत बुधवारी आहे, त्यामुळे भगवान शंकरासोबतच गणेशाची पूजा केल्याने देखील श्रीगणेशाची आशीर्वाद प्राप्त होते. अशा स्थितीत या दिवशी पूजेचे महत्त्व अधिकच वाढते. असे मानले जाते की प्रदोष व्रत केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. या विशेष दिवशी पूजा केल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते. प्रदोष व्रताच्या दिवशी शिव चालिसाच्या पठणासह शिव मंत्रांचा जप केल्याने भगवान भोलेनाथांची अपार आशीर्वाद प्राप्त होते.

पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

प्रदोष व्रत पूजा आज म्हणजेच 7 फेब्रुवारी, बुधवारी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:05 ते रात्री 08:41 पर्यंत राहील. या वेळी ते बुधवारी येत असल्याने याला बुध प्रदोष व्रत असेही म्हटले जाईल.

अशाप्रकारे करा महादेवाची आराधना

धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर, मंदिरात जा किंवा घरी भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा आणि त्यांची खऱ्या मनाने पूजा करा. शिव चालिसाचा पाठ केल्यानंतर भगवान शिव किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान करावे. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान करून दूध, दही, तूप, मध आणि साखर, तांदूळ आणि खीर अर्पण करावी.

हे सुद्धा वाचा

प्रदोष व्रतामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते. त्यामुळे सकाळच्या पूजेनंतर संध्याकाळीही भगवान शंकराची पूजा करायला विसरू नका. भगवान शिवासोबतच माता पार्वती आणि गणेशाचीही पूजा करा. आरती करून पूजेची सांगता करा आणि घरात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.

ग्रह दोष दूर करण्यासाठी उपाय

प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात. यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनिदोष, राहू-केतूचे अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात. याशिवाय प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान शिवासोबत तुम्ही देवी पार्वतीचीही पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.