Puja Tips : पूजेच्या वेळी का जाळला जातो कापूर? धार्मिक आणि शास्त्रीय कारण
कापूर जाळल्याने हवा शुद्ध होते, अशी धार्मिक मान्यता आहे, कारण कापूर जाळण्याचा तीव्र सुगंध हवेतील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहमी शुद्ध राहते. घरामध्ये रोज संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळला आणि त्याचा धूर घरभर पसरला तर घरातील सर्व दोष दूर होतात.
मुंबई : हिंदू धर्मात लोकं पूजेच्या वेळी घरात कापूर जाळतात. हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर (camphor Benefits) वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते.पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी राहते आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते, कारण कापूरमधून निघणारा धूर घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत करतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती देतो.
धार्मिक कारण
कापूरच्या धुराच्या सुगंधाने सकारात्मक ऊर्जा वाढते. पूजा, हवन किंवा आरती करताना कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण राहते. मान्यतेनुसार, देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करताना कापूर वापरला जातो. कापूर जाळणे हे सर्वशक्तिमान आहे आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. ज्याप्रमाणे कापूर जाळल्याने राख किंवा अवशेष राहत नाही, त्याचप्रमाणे पूजेच्या वेळी जाळल्याने व्यक्तीचा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो.
हे आहेत कापूर जाळण्याचे फायदे
कापूर जाळल्याने हवा शुद्ध होते, अशी धार्मिक मान्यता आहे, कारण कापूर जाळण्याचा तीव्र सुगंध हवेतील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहमी शुद्ध राहते. घरामध्ये रोज संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळला आणि त्याचा धूर घरभर पसरला तर घरातील सर्व दोष दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार कापूर जाळल्याने घर पितृदोषापासून मुक्त होते आणि घर सुखाने भरलेले राहते.
वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर
तीव्र वेदना कमी करण्यासाठी कापूर वापरला जाऊ शकतो. त्वचेवर लावल्याने लगेच फायदा होतो आणि उबदारपणाही मिळतो. स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी कापूर खूप उपयुक्त आहे.
ऑस्टियोआर्थराइटिससाठी फायदेशीर
ऑस्टियोआर्थरायटिसच्या समस्येमध्ये कापूर ग्लुकोसामाइन सल्फेट आणि कॉन्ड्रोइटिन सल्फेट सोबत वापरल्यास ऑस्टियोआर्थरायटिसचा त्रास कमी होतो. सांधेदुखीचा त्रासही कापूरने बरा होऊ शकतो.
कमी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर
तज्ज्ञांच्या मते, ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी कापूर नक्कीच वापरावा. कारण याच्या मदतीने कमी रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब दोन्हीसाठी कापूर फायदेशीर आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)