Pune Ganesh Visarjan 2021 | पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे मंडपातच विसर्जन, कधी कुठल्या गणपतीचं विसर्जन होणार पाहा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 19, 2021 | 11:26 AM

गणेशोत्सवाला दहा दिवस उलटले असून आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. आज पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झालीये. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.

Pune Ganesh Visarjan 2021 | पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे मंडपातच विसर्जन, कधी कुठल्या गणपतीचं विसर्जन होणार पाहा
ganesha-visarjan
Follow us

पुणे : गणेशोत्सवाला दहा दिवस उलटले असून आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. आज पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झालीये. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.

कधी कुठल्या गणपतीचे विसर्जन?

मानाचा पहिला

ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळ : सकाळी 11 वाजता

मानाचा दुसरा

ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ : सकाळी 11 वाजून 45 मिनीट

मानाचा तिसरा

गुरुजी तालीम गणपती मंडळ : दुपारी 12 वाजून 30 मिनीट

मानाचा चौथा

तुळशीबाग गणपती मंडळ : दुपारी 1 वाजून 15 मिनीट

मानाचा पाचवा

केसरीवाडा गणपती मंडळ : दुपारी 2 वाजता

श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ : दुपारी 2 वाजून 45 मिनीट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : सायंकाळी 6 वाजून 36 मिनीट

अखिल मंडई गणपती मंडळ : सायंकाळी 6 वाजून 30 मिनीट

विसर्जनासाठी 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहा वाजल्यापासूनच मंडपातच विसर्जन होणार आहे. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.

त्याशिवाय, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या गणेशोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी श्रींचे विसर्जन आणि उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला रविवार 19 सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी संध्याकाळी 6 वाजून 36 मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे.

गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिरामध्येच ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सलग दुसऱ्या वर्षी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रीं च्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केलं आहे. दगडूशेठच्या गणपतीचे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार असून ऑनलाईन पद्धतीने भाविकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार दगडूशेठ गणपतीचा विसर्जन सोहळा

गणपतीचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था दगडूशेठ गणपती ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण विसर्जन सोहळा ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

असा असेल विसर्जनासाठीचा बंदोबस्त

गृहरक्षक दल जवान – 450

दंगल नियंत्रण पथके – 10

राज्य राखीव पोलिस दल – 10 प्लाटुन

बॉम्ब शोधक व नाशक पथके – 08

शीघ्र कृती दल पथके – 16

मुख्यालयाकडून पोलिस ठाण्यासाठीचे मनुष्यबळ – 1100

गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके – 20

पोलिस मुख्यालयातील राखीव तुकड्या – 05

पोलिस ठाण्यांकडील पोलिस मित्र – 1 हजार

वज्र, लिमा, वरूण यांचा राखीव बंदोबस्त

संबंधित बातम्या :

Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…

अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा

Pune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI