Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नये, अन्यथा समस्या उद्भवू शकतात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 9:51 AM

राखी नेहमी शुभ मुहूर्तावर बांधली पाहिजे. भद्रा किंवा राहू काळात राखी कधीही बांधू नये. या दोन्ही वेळा अशुभ मानल्या जातात. यावेळी रक्षाबंधनाला भद्रा काळ नाही. पण राहु काळाची विशेष काळजी घ्या. राखी बांधताना दिशेची विशेष काळजी घ्या. राखी बांधताना भावाचा चेहरा दक्षिण दिशेला नसावा याची खात्री करा. उलट पूर्व किंवा उत्तर दिशेने असणे अधिक चांगले.

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नये, अन्यथा समस्या उद्भवू शकतात
रक्षाबंधन

मुंबई : रक्षाबंधनचा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. यावेळी राखी 22 ऑगस्ट 2021 रोजी आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ नेहमी तिच्या संरक्षणाचे वचन देतो आणि भेटवस्तू देखील देतो. राखी एका शुभ मुहूर्तावर बांधली जाते.

राखी बांधताना काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, काय करु नये हे जाणून घेऊया –

🔶 राखी नेहमी शुभ मुहूर्तावर बांधली पाहिजे. भद्रा किंवा राहू काळात राखी कधीही बांधू नये. या दोन्ही वेळा अशुभ मानल्या जातात. यावेळी रक्षाबंधनाला भद्रा काळ नाही. पण राहु काळाची विशेष काळजी घ्या.

🔶 रक्षाबंधनाच्या दिवशी काळ्या रंगाचा धागा बांधू नये. असे मानले जाते की हा रंग नकारात्मकतेचा प्रभाव वाढवतो. म्हणून हा रंग वापरु नये.

🔶 राखी बांधताना दिशेची विशेष काळजी घ्या. राखी बांधताना भावाचा चेहरा दक्षिण दिशेला नसावा याची खात्री करा. उलट पूर्व किंवा उत्तर दिशेने असणे अधिक चांगले.

🔶 रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि बहिणीने एकमेकांना रुमाल आणि तेल भेट देऊ नये. हे शुभ मानले जात नाही.

🔶 या विशेष दिवशी बहिणींना तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू भेट देऊ नका. या दिवशी आरसे आणि फोटो फ्रेमसारख्याही भेटवस्तू टाळल्या पाहिजेत.

🔶 भावाला टिळा लावताना अक्षतांसाठी अख्खा तांदूळ वापरा. तुटलेला तांदूळ यामध्ये वापरु नये. अक्षता म्हणजे ज्याला कोणतीही क्षति नाही.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

❇️ पौर्णिमा तिथी – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

❇️ पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 06 वाजून 15 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

❇️ राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनच्या दिवशी या देवांना बांधा राखी, पूर्ण होतील सर्व इच्छा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI