Raksha Bandhan 2025 : 8 की 9 ऑगस्ट, रक्षाबंधन नक्की कधी ? हे कन्फ्यूजन आजच करा दूर
Raksha Bandhan 2025 : श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे सर्वात सुंदर प्रतीक आहे. 2025 मध्ये म्हणजेच यंदा हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल, या सणाची नेमकी तारीख काय आणि त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घेऊया.

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींमधील प्रेमाचे प्रतीक आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा सण हा भाऊ-बहिणींना प्रेमाच्या बंधनात बांधतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर टिळा लावतात, औक्षण करून त्यांच्या मनगटावर राखी बांधतात. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी हा दिवस खूप खास असतो.
लवकरच राखी पौर्णिमा येत असून यंदा म्हणजेच 2025 मध्ये रक्षा बंधन नेमकं कधी आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. राखीचा सण 8 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल की 9 ऑगस्ट रोजी, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. चला मग नेमका दिवस, शुभ मूह्करत, तिथी सगळंच जाणून घेऊया.
रक्षाबंधन 2025 तिथी (Raksha Bandhan 2025 Tithi)
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
या वर्षी श्रावणातील पौर्णिमा शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी 02 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल.
पौर्णिमेची तिथी 9 ऑगस्ट 2025, शनिवारी दुपारी 01 वाजून 24 मिनिटांनी संपेल.
म्हणूनच रक्षाबंधन 9 ऑगस्ट, शनिवारी साजरे केले जाईल.
रक्षाबंधनाची विधी वेळ – सकाळी 05:47 ते दुपारी 01: 24 पर्यंत असेल.
भद्र काळ (Bhadra Kaal)
रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र काळाच्या वेळी राखी बांधली जात नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी भद्र काळ शुभ नसतो. म्हणून, या दिवशी अशुभ वेळी राखी बांधण्याची चूक टाळावी.
या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावतात, औक्षण करतात आणि उजव्या हातावर राखी बांधतात. तसेच त्यांना मिठाई देखीव भरवतात, एखादे छानसे गिफ्टही आजकाल दिले जाते. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. रक्षाबंधन हा एक असा पवित्र सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला पूर्ण आदर आणि सन्मान देतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
