AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramzan 2022 : सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आहारात या गोष्टींचा समावेश करा, दिवसभर ऊर्जा राहील!

रमजान (Ramzan 2022) हा अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात जवळपास महिनाभर रोजे करून अल्लाहची पूजा केली जाते. रमजानचा चंद्र दिसताच हा महिना सुरू होतो. या महिन्यात लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दुसऱ्या दिवशी रोजे (Roza) करतात. नमाज व्यतिरिक्त सेहरी आणि इफ्तारलाही रमजान महिन्यात विशेष महत्त्व आहे.

Ramzan 2022 : सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आहारात या गोष्टींचा समावेश करा, दिवसभर ऊर्जा राहील!
रमजानदरम्यान आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा आहारात समावेश करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 2:30 PM
Share

मुंबई : रमजान (Ramzan 2022) हा अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात जवळपास महिनाभर रोजे धरले जातात. रमजानचा चंद्र दिसताच हा महिना सुरू होतो. या महिन्यात लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दुसऱ्या दिवशी रोजे (Roza) करतात. नमाज व्यतिरिक्त सेहरी आणि इफ्तारलाही रमजान महिन्यात विशेष महत्त्व आहे. रमजानमध्ये सूर्य उगवण्यापूर्वी खाल्ले जाते आणि यालाच सेहरी म्हणतात, सेहरीनंतर दिवसभर काहीही खाल्ले (Food) जात नाही. सूर्यास्तानंतर खजूर खाऊन रोजा सोडला जातो, त्याला इफ्तार म्हणतात. रमजानमध्ये कमी खाण्या-पिण्याने शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता भासू शकते, परंतु सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी राहते आणि अशक्तपणा किंवा थकवा वगैरे येत नाही.

सेहरी दरम्यान या गोष्टी खा 

-सेहरीनंतर सूर्यास्तापर्यंत काहीही खायचे किंवा प्यायचे नसते, यामुळे सेहरीमध्ये अधिकाधिक आरोग्यदायी अन्नाचा समावेश करावा. तुमच्या आहारात अधिकाधिक फायबरयुक्त आहाराचा समावेश करा, यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. यासाठी तुम्ही सफरचंद, नाशपाती, बीन्स, कडधान्य इत्यादी खाऊ शकता.

-सेहरीच्या वेळी दही जरूर खावे. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील. याशिवाय कच्चे चीज आणि दूध घेतल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला पोषणही मिळते. सेहरीच्या अर्धा तास आधी पाणी प्या आणि नंतर जेवण सुरू करा. जेणेकरून दिवसभर शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

इफ्तारच्या वेळी या गोष्टी खा

-इफ्तारची सुरूवात खजूरने केली जाते. असे मानले जाते की खजूर पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या आवडत्या पदार्थ होता. खजुरपासून शरीराला झटपट ऊर्जा मिळते. हे दिवसभरातील कमजोरी दूर करण्याचे काम करते.

-रस, नारळ पाणी घ्या. याशिवाय मसालेदार पदार्थांऐवजी हलक्या, पचायला हलक्या भाज्या खाव्या ज्या सहज पचतात आणि शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात. जेवणासोबत सॅलड जरूर खावे. अन्न खाल्ल्यानंतर थोडा वेळ फिरा, मगच विश्रांती घ्या.

संबंधित बातम्या : 

Zodiac | या राशींचे भाग्य आज उजळणार, हे होतील मोठे फायदेच फायदे!

Chaitra Navratri : 51 शक्तीपीठांपैकी एक हिंगलाज शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये, ‘नानी का हज’ म्हणून प्रसिद्ध!

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी