RangPanchami 2021 | आज देशात रंगपंचमीची धूम, जाणून घ्या महत्त्व आणि इतर सर्व माहिती फक्त एका क्लिकवर…

आज 2 एप्रिलला देशात रंगपंचमीचा सण साजरा केला जात आहे (RangPanchami 2021).

RangPanchami 2021 | आज देशात रंगपंचमीची धूम, जाणून घ्या महत्त्व आणि इतर सर्व माहिती फक्त एका क्लिकवर...
Holi
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 9:13 AM

मुंबई : आज 2 एप्रिलला देशात रंगपंचमीचा सण साजरा केला जात आहे (RangPanchami 2021). मान्यता आहे की होळीच्या दिवशी रंग आणि गुलालाने लोक प्रेम आणिआपुलकी दर्शवण्यासाठी खेळतात. तर रंगपंचमीच्या दिवशी रंग-बिरंगा गुलाल देवतांना समर्पित केला जातो. त्यामुळे गुलालाला आकाशात उडवलं जातं. मान्यता आहे की रंग-बिरंगी गुलालाची सुंदरता पाहून देवता अत्यंत प्रसन्न होतात आणि यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते (RangPanchami 2021 Know The Importance Shubh Muhurt And Upay).

अशी देखील मान्यता आहे की, आकाशात उडवलेल्या गुलालाचा ज्याला कोणाला स्पर्श होतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि नकारात्मकता समाप्त होते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी राधारानी आणि भगवान कृष्णाला गुलाल समर्पित केला जातो, तर काही ठिकाणी देवी लक्ष्मीचीही पूजा केला जाते.

जन्मकुंडलीचे दोष दूरल होतील

मान्यता आहे की रंगपंचमीच्या दिवशी जर विधिवत देवाची पूजा केली तर त्याच्या कुंडलीतील सर्व मोठे दोष नष्ट होऊ शकतात. रंगपंचमी धनदायकही मानलं जातं, त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. अनेक ठिकाणी या सणाला श्री पंचमीच्या नावानेही ओळखलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करते वेळी त्यांना गुलाबाच्या फुलांचा हार, दोन वात असलेला दिवा आणि पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवावं. यानंतर त्यांच्याकडे घरावर कृपा ठेवण्यासाठी प्रार्थना करा.

देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते

मान्यता आहे की रंगपंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. पंचमीच्या दिवशी लक्ष्मीजीच्या पूजेमुळे काही ठिकाणी याला श्रीपंचमीच्या नावाने देखील ओळखलं जातं.

अशा प्रकारे करा देवी लक्ष्मीची पूजा

दोवी लक्ष्मी आणि नारायण यांचा एक फोटो उत्तर दिशेला एका पाटावर ठेवा. एका तांब्याच्या कलशात पाणी भरुन ठेवा आणि तुपाचा दिवा लावा. देवाला गुलाबाच्या फुलांची माळ समर्पित करा. देवी लक्ष्मीला खीर, मिश्री आणि नारायणला गुळ-चण्याचं नैवेद्य दाखवा. त्यानंतर आसनावर बसा आणि “ॐ श्रीं श्रीये नमः”, या मंत्राचा जप स्फटीक किंवा कमलगट्ट्याच्या माळेने करा. विधीवत पूजा केल्यानंतर आरती करा आणि क्षमा मागा. त्यानंतर कलशात ठेवलेलं जल घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शिंपडा. ज्या स्थानावर धन ठेवले जाते तिथेही हे जल शिंपडा. त्यानंतर देवासमोर हात जोडून प्रार्थना करा.

लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त

सकाळी : 04:46 – 05:33

दुपारी : 12:05 – 12:54

सायंकाळी : 07:31 – 09:00

RangPanchami 2021 Know The Importance Shubh Muhurt And Upay

महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम

महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

इंदूरची रंगपंचमी सर्वात हटके

रंग पंचमी देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण, मध्यप्रदेशातील इंदूरसारखी रंगपंचमी तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. या दिवशी शहरातील राजबाडा येथे लाखो लोक एकत्र येत मिरवणूक काढतात. याला गेर म्हणतात. या दरम्यान रामरज नावाचा गुलाल आकाशात उडवला जातो. शहरात सार्वजनिक अवकाश होता है.

या उपायांनी आर्थिक समस्या सुटेल

1. पूजेनंतर सूर्य देवाला अर्घ्य द्या. अर्घ्यदरम्यान जलमध्ये रोली, अक्षता आणि शहद नक्की टाका.

2. एका नारळावर कुंकू लावा आणि त्याला शंकराच्या मंदिरात जाऊन महादेवाला समर्पित करा.

3. तांब्याच्या कलशात पाणी घ्या, यामध्ये मसूरची डाळ घालून शिवलिंगवर जलाभिषेक करा.

RangPanchami 2021 Know The Importance Shubh Muhurt And Upay

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Holi 2021 | होळी… राधा-कृष्णाच्या प्रेमाचा प्रतीक आहे हा सण…

Holi 2021 | होळीच्या सणाला भांग का पितात? यामागील आख्यायिका काय?

Holi Bhai Dooj 2021 | आज आहे होळी भाऊबीज, जाणून घ्या या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण का करावं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.