Holi 2021 | होळीच्या सणाला भांग का पितात? यामागील आख्यायिका काय?

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Mar 29, 2021 | 12:08 PM

होळीच्या सणाला गुझिया (Gujhiya) आणि थंडाईलाही (Thandai) मोठं महत्त्व आहे.

Holi 2021 | होळीच्या सणाला भांग का पितात? यामागील आख्यायिका काय?
Bhang Thandai

मुंबई : भारतीय संस्कृतीत खानपानला अत्यंत महत्त्व देण्यात आलं आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) अनेक सार्वजनिक ठिकाणी होळाी खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे होळीला मिठाईने सजणारी दुकानं यावेळी खूप कमी प्रमाणात दिसत आहेत. होळीच्या सणाला गुझिया (Gujhiya) आणि थंडाईलाही (Thandai) मोठं महत्त्व आहे. हे ते पेय आहे, जे थंडी जाण्याच्या आणि उन्हाळा येण्यादरम्यान टेस्टी आणि पौष्टिक आहार मानला जातो. पण, होळीमध्ये याचा थेट संबंध हा भांगसोबत असतो (Bhang Tradition In Holi What Is The Story Behind It ).

होळीचे अनेक रंग आहेत. रविवारीला होलिका दहनपासून या सणाची सुरुवात झाली आणि आज सोमवारी धुळवड साजरी करण्यात येत आहे. होळीच्या दिन दिवसांनंतर रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी Covid-19 मुळे होळीचा सण साजरं करण्यावर अने प्रतिबंध लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये होळीदरम्यान सार्वजनिक उत्सवांवर प्रतिबंध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील भांगचे शासकीय मान्यता प्राप्त दुकानंही बंद असल्याच्या बातम्या आहेत.

भांग आणि होळीचा संबंध हा पारंपरिक आहे. भांगचा सरळ संबंध भगवान शंकरासोबत आहे. होळीसह भांगची परंपरा यामागे शंकरजींची कुठलीही कहाणी नाही.

एका आख्यायिकेनुसार शिव वैराग्यात होते आणि आपला तप करत होते. पार्वतीची अशी इच्छा होती की त्यांनी ही तपस्या सोडावी आणि दाम्पत्य जीवनाचं सुख भोगावं. तेव्हा कामदेवाने फूल बांधून एक बाण शंकरजींच्या दिशेने सोडला जेणेकरुन त्यांची तपस्या भंग व्हावी. या कहाणीनुसार, वैराग्यापासून शंकरजी गृहस्थ जीवनात परतण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी भांगचं प्रचलन सुरु झालं. पण याच्या तर आणखी अनेक कथा प्रचलित आहेत.

एका आणखी अख्यायिकेनुसार, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्यांचे भक्त भांगचं सेवन करतात. या अख्यायिकेनुसार भक्त प्रल्हादला मारण्याच्या अनेक प्रयत्न करणाऱ्या हिरण्यकश्यपचा संहार केल्यानंतर भगवान नरसिंहा अत्यंत क्रोधित होते. तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी अर्धा सिंह आणि अर्धा पक्षी असा शरभ अवतार भगवान शंकरजींनी घेतला.

भांग आणि होळी संबंधी समुद्र मंथनचीही एक कहाणी आहे –

धार्मिक मान्यतेनुसार, समुद्र मंथनादरम्यान जे अमृत निघालं होतं त्यांचा एक थेंब मंदार पर्वतावरही पडली होती. या थेंबातून एक झाड उगवलं. याला औषधी गुणांचा भांगचं झाड मानलं जातं.

दुधात बादाम, पिस्ता आणि काळी मिरीसोबत थोडी भांग मिसळून तयार करण्यात येणारी थंडाई हे एक अत्यंत लो​कप्रिय पेय आहे. तणावमुक्तीसाठी भांगचं सेवन देशात अनेक प्रकारे केलं जातं. विशेषकरुन होळीला मिठाई, खाण्याचे पदार्थ आणि पान यांसारख्या वस्तुंमध्ये भांग मिसळून खाल्ली जाते.

Bhang Tradition In Holi What Is The Story Behind It

संबंधित बातम्या :

Holi 2021 | अंकांनुसार निवडा शुभ रंग, जाणून घ्या कुठल्या रंगाने होळी खेळणे ठरणार तुमच्यासाठी लकी…

Rang Panchami 2021 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते…

Holi 2021 | या 5 राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी ठरणार लकी, ग्रहांच्या शुभ योगायोगाने मोठा फायदा होणार

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI