Horoscope 25th April 2021 | कोणत्या राशींवर आरोग्याचं संकट? कसाय तुमचा आजचा दिवस? वाचा राशीफळ

Horoscope 25th April 2021 | कोणत्या राशींवर आरोग्याचं संकट? कसाय तुमचा आजचा दिवस? वाचा राशीफळ
Horoscope

आपल्या जीवनात गृह आणि नक्षत्रांना विशेष महत्व आहे. ते रोज बदलत रहातात. चला तर मग बघू आज नेमक्या कोणत्या राशींवर आहे सूर्याची कृपा. कसा असेल आजचा तुमचा दिवस.

Namrata Patil

|

Apr 25, 2021 | 8:34 AM

मुंबई : आज रविवार. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असतो. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात. पण मग सूर्याची कृपा नेमकी कुणाला मिळते? पाहुयात आजचं हे राशीफळ

मेष राशी आज तुमची आर्थिक स्थिती मजबुत होईल. आरोग्यावर खास लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा नाही तर नाती खराब होतील. धार्मिक कार्यात मन लावा. मन शांत ठेवा. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

वृषभ राशी तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. शुक्र आणि चंद्र दृश्यमान स्थितीत असल्यानं तुमच्या मुला मुलीच्या लग्नाचा योग येऊ शकतो. हिरवा रंग घालणं शुभ होईल. धनू आणि मीन राशीच्या मित्रांना मदत केली तर तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.

मिथून राशी आजचा दिवस मनाला परेशान करु शकतो. कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण असेल. रिलेशनशिप तसच वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतात. सुखी जीवनासाठी देवी मातेच्या मंदिरात फुलं चढवा. आर्थिक गोष्टीत फायदा मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये धैर्य ठेवा.

कर्क राशी प्रकृती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी मित्रांकडून कौतूक होईल. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. मनातली गोष्ट सांगण्यासाठी ही योग्य वेळ आहे. इतरांच्या गोष्टीत नाक खुपसणं हाणीकारक होऊ शकतं. स्वत:च्या वाणीवर नियंत्रण ठेवा.

सिंह राशी कर्मक्षेत्रात फायदा मिळेल. व्यापार आणि प्रेम संबंधाचे मार्ग योग्य नाहीत. कौटुंबिक वाद विवादामुळे तणावाची स्थिती होऊ शकते. आरोग्याबाबत चिंता करण्याचं कारण नाही.

कन्या राशी आरोग्याची काळजी घ्या. ते बिघडू शकतं. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. कोर्टकचेरीतली कामं काही दिवस टाळा. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या आयुष्यात प्रेम किंवा विवाहाचा योग जुळतोय. अनैतिक गोष्टींपासून दूर रहा.

तुला राशी व्यावसायिक कामात यश मिळेल. धार्मिक कार्य केलात तर ते शुभ असेल. आजच्या दिवशी गाईल पालक खाऊ घातलं तर बिघडलेली कामही पूर्ण होतील.

वृश्चिक राशी आजचा दिवस शुभ असेल. जीवनसाथीसोबत तुमचे संबंध मजबुत होतील. सहकाऱ्यांच्या मदतीने धन प्राप्ती होईल. तुमची थांबलेली कामं पूर्ण होतील.

धनू राशी आरोग्याकडे खास लक्ष असू द्या. आर्थिक फायदा मिळण्याचा योग जुळतोय. आई वडीलांचं सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर होईल. त्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरु नका. जुन्या मित्रांना भेटल्यानं कार्य संपन्न होईल.

मकर राशी घाईगडबडीत कुठला फैसला घेऊ नका. विचार करुन निर्णय घ्या. वैवाहिक जीवनात तणाव होऊ शकतो. आर्थिक गोष्टींमध्ये रिस्क घ्यावी लागेल. नोकरीसाठी परदेशी जाण्याचा योग बनतो आहे.

कुंभ राशी आज व्यापारात फायदा मिळेल. संबंधात गोडवा असेल. स्वत:च्या मुला मुलींच्या आरोग्यावर खास ध्यान द्या. वैवाहिक जीवन आनंदी असेल. रागावर नियंत्रण ठेवा.

मीन राशी कामाच्या ठिकाणी तणावाची स्थिती राहील. नव्या जॉबसाठी मन तयार होतंय. शिक्षण आणि लेखनाच्या क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थितीवर काहीही परिणाम होणार नाही. पिवळा रंग घालणं शुभ होईल. (Horoscope 25th April 2021)

संबंधित बातम्या :

Vastu Tips | करिअरमध्ये यश हवं असेल, तर ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल…

Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें