AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्र-शनीच्या भेटीने ‘या’ भाग्यवान राशींचे उजळेल नशिब, व्हाल धनवान

शनिदेव आणि राक्षस गुरु शुक्र यांची लवकरच युती होणार आहे. जे काही राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होईल. ज्यामध्ये या राशीच्या लोकांना धन लाभाच्या संधी मिळतील.

शुक्र-शनीच्या भेटीने 'या' भाग्यवान राशींचे उजळेल नशिब, व्हाल धनवान
| Updated on: Nov 29, 2024 | 5:14 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. याचबरोबर अनेकवेळा राशी परिवर्तनाने इतर कोणत्याही ग्रहांशी त्यांची युती होत असते. ज्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर दिसून येतो. यावेळी शनी आणि शुक्र कुंभ राशीत असणार आहेत. वर्ष २०२४ च्या अखेरीस कर्म देणारा शनी आणि सुख-समृद्धी देणारा शुक्रदेव या दोघांचे ही साधन असणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. ज्यातील संयोजन काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

शनी आणि शुक्राची युती कधी होणार?

पंचांगानुसार शनी आणि दैत्य गुरु शुक्रदेव दोघेही 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करतील. हा संयोग सुमारे 1 महिना म्हणजे 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.12 वाजेपर्यंत चालणार आहे.

‘या’ राशींना होणार फायदा

वृषभ रास

शनी आणि शुक्र हे दोन ग्रह एकमेकांचे मित्र मानले जातात. यावेळी वर्ष 2024 च्या अखेरीस वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या संयोजनाचा मोठा फायदा होणार आहे. ज्यामुळे या राशींच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक कार्यात यश मिळेल. प्रगतीसह व्यवसायात नफा होऊ शकतो.त्याचबरोबर कुटुंबाचे पूर्ण सहकार्य देखील मिळणार आहे. तसेच या राशींच्या लोकांची रखडलेली कामेही पूर्ण होऊ शकतील.

तूळ रास

तुळ राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्राची युती शुभ संकेत घेऊन येत आहे. अशावेळी या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. त्यातच करिअरमध्ये सुद्धा उंची गाठू शकाल. शिक्षण किंवा अवघड परीक्षेचा निकाल आपल्या बाजूने येऊ शकतो. नोकरीत पदोन्नतीचे योग येतील. तसेच तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबाचे मोलाचे सहकार्य मिळेल.

कुंभ रास

कुंभ राशीत शनी आणि शुक्राची युति तयार होत असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी हे कॉम्बिनेशन खूप फायदेशीर ठरणार आहे. अशावेळी कुंभ राशीचे लोक नोकरीत पदोन्नतीसह पगार वाढवू शकतात. जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. समाजात चांगला सन्मान मिळेल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. याशिवाय आर्थिक स्थिती मजबूत राहील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.