सतयुगातील कन्येचा द्वापारयुगातील श्रीकृष्णाचा भाऊ बलदाऊशी विवाह, जाणून घ्या ही पौराणिक कथा

भगवान श्रीकृष्णांच्या लीला आपण सर्वांनीच ऐकल्या आहेत (Revati Married To Balram). त्या लीलांमध्ये कृष्णाचा मोठा भाऊ बलदाऊ यांचेही अनेक उल्लेख आढळतात.

सतयुगातील कन्येचा द्वापारयुगातील श्रीकृष्णाचा भाऊ बलदाऊशी विवाह, जाणून घ्या ही पौराणिक कथा
Baldau Marriage
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 12:19 PM

मुंबई : भगवान श्रीकृष्णांच्या लीला आपण सर्वांनीच ऐकल्या आहेत (Revati Married To Balram). त्या लीलांमध्ये कृष्णाचा मोठा भाऊ बलदाऊ यांचेही अनेक उल्लेख आढळतात. परंतु बलदाऊच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज आपण बलदाऊच्या लग्नाची एक रोचक कथा जाणून घेऊ (Satyuga Girl Revati Married To Balram In Dwaparyuga Know This Interesting Pouranik Katha) –

पौराणिक कथेनुसार, सत्ययुगात रैवतक नावाचा एक राजा होता. त्याला पृथ्वीचा सम्राट म्हटले जाते. त्याला एक मुलगी रेवती होती. रेवती यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रैवतकने एक योग्य कन्या म्हणून तयार केले. जेव्हा रेवती मोठी झाली, तेव्हा रैवतकने रेवतीसाठी तिच्या योग्य वराचा शोध करत होते. पण त्याला पृथ्वीवर कोणताही योग्य वर सापडला नाही. तो अतिशय निराश झाला आणि आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्या मुलीसह त्याने ब्रह्मलोक गाठला.

ब्रह्माजी यांनी बलदाऊचं नाव पुढे केलं

ब्रह्मलोक गाठल्यावर राजा रैवतकने सर्व हकीगत ब्रह्माजींसमोर मांडली. त्यांचे ऐकून ब्रह्मा जी हसले आणि म्हणाले अस्वस्थ होऊ नका. आपण पृथ्वीवर परत जा, तिथे भगवान कृष्णाचा मोठा भाऊ बलदाऊ आपल्या मुलीसाठी योग्य वर असल्याचं सिद्ध होईल. मुलीसाठी बलारामासारख्या वराबद्दल ऐकून रैवतक अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माजींचे आभार मानले आणि पृथ्वीच्या दिशेने निघाले.

लहान आकाराच्या मनुष्यांना पाहून रैवतक झाले चकित

जेव्हा राजा रैवतक आपल्या मुलीसह पृथ्वीवर आले, तेव्हा पृथ्वीवर आकाराने लहान माणसे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. हे सर्व कसे घडले त्यांना काहीही कळत नव्हते. जेव्हा ते लोकांशी तेथील लोकांशी बोललो तेव्हा कळालं ते द्वापारयुग होतं. सतयुगात मनुष्याची लांबी 32 फूट म्हणजेच 21 हात, त्रेतायुगात 21 फूट म्हणजे 14 हात आणि द्वापारयुगात 11 फूट म्हणजे सुमारे 7 हात होते.

बलदाऊंनी नांगराने दाबून रेवतीला छोटं केलं

हे ऐकून रैवतक खूप अस्वस्थ झाले आणि बलदाऊकडे पोहोचले. त्यांनी बलदाऊला विचारले, हे सर्व कसे घडले? तेव्हा बलराम हसला आणि त्यांना सांगितले की तुम्ही ब्रह्मलोकला गेला होतात. तिथे जाऊन पृथ्वीवर परत येण्यास सतयुग आणि त्रेतायुग अशी दोन युगं निघून गेली. हे द्वापारयुग सुरु आहे. म्हणूनच तुम्हाला लोक आकाराने लहान दिसत आहेत.

मग रैवतक म्हणाला, इतक्या लहान उंचीच्या पुरुषासोबत माझ्या मुलीचे लग्न कसे शक्य आहे. बलदाऊ हसले आणि त्यांनी आपल्या नांगराने रेवतीला खाली दाबले. यामुळे रेवतीची उंची कमी झाली. रैवतक हे पाहून खूप आनंदी झाले. यानंतर, त्यांनी बलरामबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावले आणि ते सन्यासासाठी निघून गेले .

Satyuga Girl Revati Married To Balram In Dwaparyuga Know This Interesting Pouranik Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Kedarnath Temple | पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवलं? जाणून घ्या पांडव आणि महादेवाची ही पौराणिक कथा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.