AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani dev : शनिदेवाच्या डोळ्यात डोळे घालू नये असे का म्हणतात? अशी आहे धार्मिक मान्यता

शनि मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही शनि मूर्तीची पूजा करू नये. तसेच त्यांची मूर्ती घरात बसवू नये. शनीची वाईट नजर ज्या व्यक्तीवर पडते, त्याच्यावर वाईट काळ सुरू होतो, अशी चर्चा अनेकदा केली जाते.  यामागे एक पौराणिक मान्यता आहे. शनीची पत्नी परम तेजस्विनी होती. एके रात्री ती मुलगा होण्याच्या इच्छेने त्याच्याकडे गेली...

Shani dev : शनिदेवाच्या डोळ्यात डोळे घालू नये असे का म्हणतात? अशी आहे धार्मिक मान्यता
शनिदेवImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 12, 2023 | 2:43 PM
Share

मुंबई : शनिदेवाला  कर्माचे फळ देणारी देवता मानल्या जाते. शनि वाईट कर्मांसाठी खूप कठोर शिक्षा देतात आणि चांगल्या लोकांना चांगल्या कर्मांचे शुभ फळ देतात. शनीला तेल, तीळ आणि काळा रंग खूप आवडतो. तुम्ही लोकांना मंदिरात या वस्तू अर्पण करताना पाहिलं असेल. शनि मंदिरात (Shani Story) अनेकांना तुम्ही बाजूने दर्शन करताना पाहिलं असेल. तसेच शनिदेवाच्या डोळ्यात डेळे घालून पाहू नये असंही आपल्याला जुने लोकं सांगायचे  पण तुम्हाला माहीत आहे का या गोष्टींमध्येही अनेक मोठे रहस्य लपलेले आहेत.

शनी न्यायाधीश असण्याचे रहस्य

सूर्य हा राजा, बुध मंत्री, मंगळ सेनापती, शनि न्यायाधीश आणि राहू-केतू प्रशासक आहेत असे मानले जाते. समाजात जेव्हा जेव्हा कोणी गुन्हा करतो तेव्हा शनि त्याला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा देतो. राहू आणि केतू शिक्षा देण्यासाठी सक्रिय होतात. शनीच्या दरबारात आधी शिक्षा दिली जाते आणि नंतर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सुख द्यायचे की नाही यावर खटला चालतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

शनिदेवाच्या दृष्टीचे रहस्य

शनि मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही शनि मूर्तीची पूजा करू नये. तसेच त्यांची मूर्ती घरात बसवू नये. शनीची वाईट नजर ज्या व्यक्तीवर पडते, त्याच्यावर वाईट काळ सुरू होतो, अशी चर्चा अनेकदा केली जाते.  यामागे एक पौराणिक मान्यता आहे. शनीची पत्नी परम तेजस्विनी होती. एके रात्री ती मुलगा होण्याच्या इच्छेने त्याच्याकडे गेली. शनिदेव भगवान विष्णूच्या ध्यानात मग्न होते. अशा रीतीने बायको वाट पाहून थकली. पत्नीने संतापून शनिदेवाला शाप दिला. शनिदेवाच्या पत्नीने शाप दिला की, तुम्ही ज्याच्याकडे पाहाल  त्याचा नाश होईल. त्यामुळे शनिदेवाची दृष्टी आपल्यावर पडू नये असे म्हणतात.

आपण शनीला तेल का अर्पण करतो?

एकदा सूर्यदेवाच्या सांगण्यावरून हनुमानजी शनीची समजूत काढायला गेले. शनीला पटले नाही आणि युद्ध करण्यास तयार झाला. हनुमानजींनी युद्धात शनिदेवाचा पराभव केला. या युद्धात शनीला गंभीर दुखापत झाली. शनीच्या जखमा कमी करण्यासाठी हनुमानजींनी त्याला तेल दिले. यावर शनि म्हणाले की जो कोणी मला तेल अर्पण करतो. मी त्याला त्रास देणार नाही आणि त्याचे दुःख कमी करीन. तेव्हापासून शनीला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.

शनिदेवाचा कोप कसा टाळावा

जर तुम्हाला शनीचा कोप टाळायचा असेल तर इतरांबद्दल वाईट बोलणाऱ्या आणि कट रचणाऱ्या लोकांपासून दूर राहा. इतरांबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका. कोणाचेही नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. कोणाचेही हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. निष्काळजीपणा टाळा. सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. सूर्यास्ताच्या वेळी अजिबात झोपू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.