Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत कांदा-लसूण का खाल्ले जात नाही, जाणून घ्या

देवी दुर्गाच्या पूजेचे पवित्र दिवस 7 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहेत. नवरात्री (Shardiya Navratri 2021) दरम्यान मातेला प्रसन्न करण्यासाठी काही लोक नऊ दिवस उपवास ठेवतात. तर काही लोक पहिल्या आणि अष्टमीच्या दिवशी उपवास ठेवतात. जे उपवास करत नाहीत, ते देखील नवरात्रीचे सर्व नियम पाळतात.

Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत कांदा-लसूण का खाल्ले जात नाही, जाणून घ्या
mata-durga
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 09, 2021 | 2:07 PM

मुंबई : देवी दुर्गाच्या पूजेचे पवित्र दिवस 7 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहेत. नवरात्री (Shardiya Navratri 2021) दरम्यान मातेला प्रसन्न करण्यासाठी काही लोक नऊ दिवस उपवास ठेवतात. तर काही लोक पहिल्या आणि अष्टमीच्या दिवशी उपवास ठेवतात. जे उपवास करत नाहीत, ते देखील नवरात्रीचे सर्व नियम पाळतात.

या दिवसात घरात शुद्धतेची खूप काळजी घेतली जाते. जे लोक उपवास करत नाहीत ते नऊ दिवस कांदा आणि लसूण खात नाहीत. काही लोकांना याचे कारण देखील माहित नाही, फक्त इतरांकडे पाहून आणि धार्मिक नियमांचा हवाला देऊन ते तसे करतात. तर इथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नवरात्री दरम्यान कांदा आणि लसूण यांचे सेवन का बंद केले जाते.

तामसिक अन्न

हिंदू धर्मग्रंथांमध्ये, एखाद्या व्यक्तीला सात्विक जीवन जगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण, हे अन्न आपल्या मनाच्या स्थितीवर देखील परिणाम करते. म्हणूनच असे म्हणतात की ‘जसे अन्न, तसे मन’. सात्विक अन्न मन शांत आणि स्थिर ठेवते, तर तामसिक अन्न मनाला विचलित करते. कांदा आणि लसूण हे तामसिक अन्न मानले जाते. नवरात्रीचे दिवस देवीच्या पूजेचे दिवस असल्याने अशा स्थितीत तामसिक अन्न मनाला त्रास देते आणि आईच्या पूजेत अडथळे निर्माण करतात.

मन अस्वस्थ करते

कांदा आणि लसूणमधील तामसिक गुणधर्मांमुळे ते मन चंचल बनवते. एका ठिकाणी एकाग्र होण्यास परवानगी देत ​​नाही. या व्यतिरिक्त, कांदा-लसूण सेवन केल्याने व्यक्तीची कामुक ऊर्जा जागृत होऊ लागते आणि व्यक्तीचे मन भोग आणि ऐषारामाकडे आकर्षित होते. तर उपवास आणि साधनेच्या वेळी एखाद्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामुळेच नऊ दिवस कांदा-लसूण न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

समुद्रमंथनाशी संबंधित कथाही प्रचलित आहे

पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णू समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेले अमृत देवतांमध्ये वाटप करत होते, तेव्हा स्वरभानू नावाचा राक्षस देवतांच्या पंक्तीत देवाचं रुप घेऊन बसला आणि त्याने अमृताचे सेवन केले. जेव्हा भगवान विष्णूला हे कळले तेव्हा त्यांनी स्वरभानूचे डोके त्याच्या धडापासून वेगळे कापले. मस्तकाचे धडापासून विभक्त झाल्यानंतर स्वरभानूच्या मस्तकाला राहू आणि धडाला केतू म्हटले गेले.

डोक्यापासून धड वेगळे झाल्यावर अमृताचे दोन थेंब पृथ्वीवर पडले. ज्यातून कांदा आणि लसूण तयार झाले. अमृतापासून मिळवल्यामुळे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. परंतु त्यांची उत्पत्ती राक्षसांद्वारे झाली आहे, म्हणून ते अपवित्र मानले जाते आणि पूजेच्या कार्यात ते समाविष्ट केले जात नाहीत.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shardiya Navratri 2021 : नवरात्रीचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत चुकूनही ही कामे करु नये, अन्यथा संकटं वाढू शकतात

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें