AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan 2022: या धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने, दारिद्र्य पळेल दूर, शिवाची होईल कृपा

श्रावणामध्ये विविध धातू आणि रत्नांनी बनवलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. जाणून घेऊया कोणत्या धातू आणि रत्नांची पूजा केल्याने कोणती फळे मिळतात.

Shravan 2022: या धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने, दारिद्र्य पळेल दूर, शिवाची होईल कृपा
स्फटिकाचे शिवलिंग Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 03, 2022 | 4:58 PM
Share

भगवान शिवाची पूजा (Shiv worship) बाराही महिन्यात केली जाऊ शकते, परंतु हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पाचवा महिना श्रावण (Shravan 2022) भगवान शिवाला समर्पित आहे आणि या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने विशेष फळ मिळते. श्रवणामध्ये, भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी नियमितपणे जल अर्पण करतात (Jal Abhishek), तर काही सोमवारी उपवास करतात (Shravan somwar Vrat). भगवान शंकराची कृपा मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. शास्त्रांमध्ये भगवान शिवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. श्रावणामध्ये विविध धातू आणि रत्नांनी बनवलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. जाणून घेऊया कोणत्या धातू आणि रत्नांची पूजा केल्याने कोणती फळे मिळतात.

धातूच्या शिवलिंगाची पूजा

लोखंडी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने नियमित अभिषेक केल्यास शत्रूंचा नाश होतो, अशी मान्यता आहे. दुसरीकडे, तांब्याच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळते.

– पितळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते. दुसरीकडे सन्मानासाठी चांदीच्या शिवलिंगावर अभिषेक करावा.

– सोन्याच्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने दीर्घायुष्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते असे म्हटले जाते. आणि पितळेचे शिवलिंग व्यक्तीला कीर्ती मिळवून देते.

रत्नांचे शिवलिंग

शास्त्रानुसार स्फटिकाच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिऱ्याच्या शिवलिंगाची पूजा केल्याने आयुष्य वाढते. नीलमणी बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सन्मानात वाढ होते.

रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल तर मोत्याच्या शिवलिंगाची पूजा करा. रुबी शिवलिंगाची पूजा सूर्य, प्रवाळाची पूजा मंगळ आणि पन्ना शिवलिंगाची पूजा बुध कमजोर असल्यास केली जाते. पुष्कराजापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने वैवाहिक सुख प्राप्त होते.

पाराच्या शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व सुख प्राप्त होते. त्यामुळे हे शिवलिंग शास्त्रात सर्वात खास मानले गेले आहे. पाराच्या शिवलिंगाची पूजा केल्याने कधीही दरिद्री होत नाही असे मानले जाते. भक्तावर लक्ष्मी देवीची सदैव कृपा असते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!