AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan 2022: 850 वर्षे जुने राजेश्वर मंदिर, जिथे शिवलिंगाचा रंग बदलतो

14 जुलैपासून उत्तर भारतीयांचा श्रावण महिना (Shravan 2022) सुरू झालाआहे. त्याचवेळी 12 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असेल. श्रावण हा भगवान महादेवाचा (Mahadev) अत्यंत प्रिय महिना आहे. शिवभक्तसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या आधीही आपण भगवान शिव यांच्या जागृत देवस्थाबद्दल जाणून घेतले आहे. आज आपण भगवान शिवाच्या आणखी एका जागृत देवस्थानाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल […]

Shravan 2022: 850 वर्षे जुने राजेश्वर मंदिर, जिथे शिवलिंगाचा रंग बदलतो
| Updated on: Jul 20, 2022 | 10:11 AM
Share

14 जुलैपासून उत्तर भारतीयांचा श्रावण महिना (Shravan 2022) सुरू झालाआहे. त्याचवेळी 12 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असेल. श्रावण हा भगवान महादेवाचा (Mahadev) अत्यंत प्रिय महिना आहे. शिवभक्तसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या आधीही आपण भगवान शिव यांच्या जागृत देवस्थाबद्दल जाणून घेतले आहे. आज आपण भगवान शिवाच्या आणखी एका जागृत देवस्थानाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल असे मानले जाते की, हे मंदिर सुमारे 850 वर्षे जुने आहे. पौराणिक कथेनुसार राजखेडा येथील एका सावकाराने नर्मदा नदीतून चमत्कारिक शिवलिंग आणले. उत्तर प्रदेशातील शम्साबाद रोड राजपूर चुंगी येथे भोलेनाथाचे हे अद्भुत राजेश्वर (rajeshwar Temple) धाम आहे.

असे झाले शिवलिंग स्थापित

राजखेड्यात शिवलिंगाची स्थापना सावकारांना करायची होती, असे सांगितले जाते. रात्री विश्रांतीसाठी राजपूर चुंगी येथे मुक्काम केला असता. तेव्हा त्यांना स्वप्नात शिवलिंगाच्या स्थापनेची कल्पना आली, पण डोळे उघडताच तो ते स्वप्न विसरून गेला. तो त्याच्या मुक्कामासाठी चालायला लागला. सावकाराने शिवलिंग बैलगाडीत नेण्यास सुरुवात करताच बैल अचानक थांबले. शिवलिंग बैलगाडीतून पडले आणि जमिनीवर स्थापित झाले.

कोणीच उचलू शकले नाही शिवलिंग

सावकाराने शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण अपयश आले. राजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेकांनी शिवलिंग हटवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वजण अपयशी ठरले. शंकराचा हा महिमा पाहून या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले.

तीन वेळा बदलतो रंग

राजेश्वर महादेव मंदिरात बसवलेले शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते. सकाळी शिवलिंगाचा रंग पांढरा असतो. मध्यान्ह आरतीच्या वेळी हलका निळा असतो. त्याचवेळी संध्याकाळी आरतीच्या वेळी शिवलिंगाचा रंग गुलाबी होतो. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून मंदिरात जत्रा भरते. ज्यामध्ये भाविक जलाभिषेकासाठी रांगा लावतात. श्रावणमध्ये पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडतात. या शिवधाममध्ये कोणीही भक्त रिकाम्या हाताने परतत नाही, असा विश्वास आहे. त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते.

कसे जायचे

मंदिरात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जर तुम्ही आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेने येत असाल तर शम्साबाद रोडने तुम्ही येथे पोहोचू शकता. पॉवर स्टेशनपासून इथपर्यंत ऑटो आणि बसेस उपलब्ध आहेत.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.