Sita Navami 2021 | सीता नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचं महत्त्व

माता सीतेचे स्थान अनन्य साधारण आहे. भगवान श्रीरामांची अर्धांगिनी आणि संपूर्ण जगाची पूज्यनीय (Sita Navami 2021) माता सीतेला भाविक हृदयात स्थान देतात.

Sita Navami 2021 | सीता नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचं महत्त्व
Sita Navami

मुंबई : माता सीतेचे स्थान अनन्य साधारण आहे. भगवान श्रीरामांची अर्धांगिनी आणि संपूर्ण जगाची पूज्यनीय (Sita Navami 2021) माता सीतेला भाविक हृदयात स्थान देतात. देवी सीतेचा जन्म दिवस हा सीता नवमी म्हणून साजरा केला जातो (Sita Navami 2021 Know The Importance Of This Auspicious Day Shubh Muhurat And Puja Vidhi).

सीता नवमी हा हिंदूंच्या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. कारण, या दिवशी भाविक सीतेचा जन्म दिवस म्हणून साजरा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा शुभ दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला येतो. यावर्षी सीता जयंती ज्याला जानकी नवमी म्हणूनही ओळखली जाते, आज 21 मे 2021 रोजी साजरी केली जाईल.

या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. त्यासोबतच या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-शांती राहाते. या विशेष दिवशी भगवान राम आणि देवी सीतेची पूजा केली जाते. जानकी जयंतीचा शुभ मुहूर्त आणि याच्या महत्वाबाबत जाणून घेऊ

सीता नवमीचा शुभ मुहूर्त

🌀 सीता नवमीची सुरुवात – 20 मे 2021 रोजी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांपासून

🌀 सीता नवमी समाप्त – 21 मे रोजी 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत

सीता नवमीचे महत्त्व –

सीता नवमीला अनेक शुभ योग बनत आहेत. मान्यता आहे की देवी सीता या देवी लक्ष्मीचा अवतार आहेत. देवी सीतेला पतीचे धैर्य आणि समर्पणासाठी ओळखलं जातं. त्यामुळे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. शास्त्रांनुसार, या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने तीर्थयात्रा आणि दान केल्याप्रमाणे फळ मिळतं.

सीता नवमीला उपवास कसा ठेवावा –

🔶 सकाळी-सकाळी उठून स्नान करा आणि उपवासाचे संकल्प घ्या

🔶 त्यानंतर घरातील मंदिरात विधीवत पूजा करा.

🔶 घरात गंगा जल असेल तर देवी- देवतांना स्नान करण्यासाठी घेतलेल्या पाण्यात थोडं गंगा जल मिसळा

🔶 त्यानंतर भगवान राम आणि देवी सीतेची पूजा करा.

🔶 सायंकाळी भगवान राम आणि देवी सीतेला नैवेद्य दाखवा

सीता नवमी 2021 पूजा विधी

💠 पूजेसाठी सर्व सामुग्री जसे की फुले, प्रसाद, नवीन कपडे इत्यादी जमवा

💠 भगवान राम आणि देवी सीतेचा अभिषेक करा आणि त्यांना नवीन कपडे घाला

💠 चंदनाचा टिळा करा, देवतांना फुले, धूप आणि नैवेद्य द्या

💠 सीता नवमी व्रत कथा वाचा आणि पूजा संपन्न करण्यासाठी आरती करा.

असे म्हटले जाते की, भक्तांनी पूजेवेळी आपल्या हातात किंवा गळ्यामध्ये 12 मुखी रुद्राक्षांची माळ घालावी. यामुळे त्यांचं आंतरिक शुध्दीकरण होते आणि इच्छाशक्ती मजबूत होते.

देवी सीतेची जन्म कथा –

वाल्मिकी रामायणानुसार, एकदा मिथिला येथे भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुले राजा जनक खूप चिंतेत होते. तेव्हा या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी ऋषींनी यज्ञ करण्याची आणि जमीनिवर नांगर चालवण्याचा सल्ला दिला. ऋषींच्या आदेशानुसार, राजा जनकने यज्ञ केलं आणि जमीनिवर नांगर चालवू लागले आणि या दरम्यान त्यांना एक सुंदर कन्या मिळाली. राजा जनकला मूल नव्हतं आणि त्या कन्येला हातात उचलताच त्यांचा पिता प्रेमाचा अनुभव झाला. त्यांनी त्या कन्येचं नाव सीता नाव ठेवलं आणि आपल्या पुत्रीच्या रुपात तिला स्विकारलं.

Sita Navami 2021 Know The Importance Of This Auspicious Day Shubh Muhurat And Puja Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ganga Saptami 2021 | कळत-नकळत घडलेल्या पापांतून मुक्ती आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गंगा सप्तमीला हे उपाय करा

Surdas Jayanti 2021 | ज्यांना स्वत: भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले, कोण होते सूरदास? जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI