Vastu | मानसिक तणावात आहात ? कशातच मन लागत नाही आहे तर , हे वास्तू दोष अत्ताच दूर करा
आजकाल लोक उत्तम सोयीसुविधा (Better Life) मिळविण्यासाठी नेहमीच चिंतेत असतात. ज्यांना सुविधा मिळत नाहीत त्यांना त्या मिळण्याची चिंता तर असतेच, पण त्या लोकांची मानसिक चिंताही संपण्याचे नाव घेत नाही, ज्यांच्याकडे सर्व प्रकारचे सुख उपभोगण्याची सर्व साधने उपलब्ध असतात .

मुंबई : आजकाल लोक उत्तम सोयीसुविधा (Better Life) मिळविण्यासाठी नेहमीच चिंतेत असतात. ज्यांना सुविधा मिळत नाहीत त्यांना त्या मिळण्याची चिंता तर असतेच, पण त्या लोकांची मानसिक चिंताही संपण्याचे नाव घेत नाही, ज्यांच्याकडे सर्व प्रकारचे सुख उपभोगण्याची सर्व साधने उपलब्ध असतात . जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्याकडे सर्व काही असूनही, सर्व प्रकारच्या चिंता (Tension), कलह किंवा अन्यथा मानसिक ताण संपण्याचे नाव घेत नाही .आयुष्यात तुमचे मानसिक स्वास्थ सर्वांत महत्त्वाचे असते. कोरोना काळामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण खूपच नकारात्मक झाले आहे. दररोजची वाईट बातमी आणि आपल्या प्रियजनां पासून दूर होण्याची भीती या सारख्या गोष्टी मनात घर करतात. यामुळे लोकांना तणावाचा सामना करावा लागतो आहे. लोकं चिंतीत होत आहे. यावेळी सर्व लोकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरी राहणे. यामुळे एकटेपणा जाणवतो त्यासाठी घरातील वास्तू दोष (Vastu Tips) अत्ताच दुर करा.
- वास्तूनुसार एका मजली घराच्या भिंतींची सरासरी उंची 10 फूट असणे शुभ मानले जाते. फ्लॅटच्या भिंतीची उंची केवळ साडेआठ फूट असेल, तर अशा घरात अनेकदा मानसिक तणाव, चिंता राहतात.
- वास्तूनुसार घरात कधीही बंद नसलेल्या विजेच्या वस्तू घरात ठेवाव्यात. अशा वस्तू स्थिरतेचे सूचक असतात. खराब झालेल्या विद्युत वस्तूंमधून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात कलह आणि तणाव निर्माण होतो.
- वास्तूनुसार, बेडरूममध्ये अशी वस्तू कधीही ठेवू नका ज्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. उदाहरणार्थ, बेडरुममध्ये बेडच्या खाली किंवा जवळ जड वस्तू कधीही ठेवू नये. त्याचप्रमाणे बेडरूममध्ये टीव्ही किंवा म्युझिक सेट लावू नये.
- वास्तूनुसार घर बांधताना दोन दरवाजे कधीही समोरासमोर नसावेत. दोन दरवाजे बनवायचे असतील तर दोन्ही दरवाजे एकमेकांपासून थोडे दूर करावेत. त्याचप्रमाणे एका दरवाजाच्या वर एक दरवाजा बांधू नये. अशा दरवाजाशी संबंधित वास्तू दोष आर्थिक चिंता वाढवतो.
- वास्तूनुसार जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा लावू नये. त्याचप्रमाणे तुमच्या खोलीत टीव्ही सेट असेल तर तो कपड्याने झाकून ठेवा कारण त्याची स्क्रीन तुमच्या पलंगाचे प्रतिबिंब देखील दर्शवते, जो वास्तुनुसार एक मोठा दोष मानला जातो.
- वास्तूनुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात विहीर, बोरिंग, भूमिगत पाण्याची टाकी बांधू नये, कारण त्याच्याशी संबंधित वास्तू दोष उत्पन्नापेक्षा खर्च अधिक करतो.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
‘धर्मनाथ बिज’ म्हणजे काय आहे, जाणून घ्या तीचे महत्त्व
02 February 2022 Panchang | 2 फेब्रुवारी 2022, बुधवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
