सुर्य गोचर : या दोन राशींचे भाग्य फळफळणार, पाहा कोणत्या राशींना फायदा
Surya Gochar 2025: सुर्यदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने दोन राशीच्या व्यक्तींना ढीगाने फायदे होणार आहेत. सुर्यदेव अशा दोन राशींवर प्रसन्न होणार आहेत, आज बुधवारपासून सुर्याचा नक्षत्र बदल होत असून दोन राशींना तो सुखाचेद्वार दाखविणार आहे.

ज्योतिषशास्राच्या मते सुर्य देवाने १९ फेब्रुवारीपासून नक्षत्र बदलेले आहे. आत्माकारक सुर्यदेवाच्या नक्षत्र परिवर्तानाने दोन राशींचे भाग्यबदलणार आहे. सुर्यदेवाने आज दुपारी १२.३४ वाजता शतभिषा नक्षत्र ( Surya Shatabhisha Nakshatra 2025) – प्रवेश केलेला आहे. शतभिषा नक्षत्रात सुर्यदेवाची उपस्थिती आता ३ मार्चपर्यंत राहणार आहे. १४ मार्च रोजी सुर्य देव कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहेत.
वृषभ राशीवाल्यांच्या फायदा काय (Taurus Luck 2025)
सूर्यदेवाच्या नक्षत्र बदलाने वृषभ राशीच्या लोकांना देखील फायदा होणार आहे, या राशीच्या लोकांना सर्वात अधिक लाभ त्यांच्या व्यवसायात होणार आहे. नव्या कामांचा श्रीगणेशा किंवा शुभारंभ करण्याचा हा काळ आहे. अडकलेली कामे आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.शुभकार्यात यश मिळणार आहे. तुमच्या,जवळच्या व्यक्तीची मदत तुम्हाला होणार आहे. आरोग्य उत्तम राहाणार आहे. सरकारी पातळीवर काम होऊन फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे.मानसन्मान मिळण्याची खात्री आहे.
कुंभ राशीला काय लाभ
सुर्यदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने आणखी एका राशीला ढीगाने फायदे होणार आहेत. कुंभ ज्यांची रास आहे, त्यांना मोठा धनलाभ या काळात होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे.मन प्रसन्न राहणार आहे.आत्मविश्वासात वाढ होणार आहे. धन मिळविण्याचे मार्गात वाढ होणार आहे. पद आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. करियरमध्ये सफलता मिळणार आहे. शैक्षणिक कामात प्रगती होणार आहे. स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. धार्मिक प्रवास होण्याचे योग आहेत. दान आणि पुण्यात भागीदारी वाढणार आहे. भोलेनाथ शिवशंकराची आराधना करुन रोज सुर्यदेवाची उपासना करुन अर्ध्य दिल्यास देवाचा आशीवार्द तुम्हाला आणखीन प्रगतीच्या मार्गावर नेणार आहे.




( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)