AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनुष्यजन्मातील पाप किंवा पुण्यच ठरवते स्वर्ग की नरकात जागा मिळणार? जाणून घ्या कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा मिळते?

आपल्या पदाचा गैरवापर करून निरापराध्यांचा छळ करणाऱ्या लोकांना वैतरणी नदीचे कष्ट भोगावे लागतात. असे मानले जाते की या नदीमध्ये मानवी शरीरे, त्यांची कवटी, सांगाडे आणि रक्त, पू आणि इतर घाणेरड्या गोष्टी असतात.

मनुष्यजन्मातील पाप किंवा पुण्यच ठरवते स्वर्ग की नरकात जागा मिळणार? जाणून घ्या कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा मिळते?
गरुड पुराणात धनाचा संबंध स्वच्छतेशी सांगताना सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी असे वाटत असेल तर घरासोबतच शारीरिक स्वच्छतेकडेही पूर्ण लक्ष द्या. जिथे घाण असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. हे जरी शास्त्रोक्त पद्धतीने बघितले तरी ते अगदी बरोबर असल्याचे सिद्ध होते कारण जिथे घाण असते तिथे रोग आणि नकारात्मकता असते. अशा ठिकाणी पैसा पाण्यासारखा वाया जातो आणि त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारे त्रास होतो.
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 26, 2021 | 3:32 PM
Share

मुंबई : गरुड पुराणाला सनातन धर्मामध्ये महापुराण असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे लोकांना वाईट कृत्य सोडून चांगले जीवन जगण्यासाठी धर्माच्या मार्गाचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला आहे. गरुड पुराणात योग्य आणि चुकीच्या कर्मांचे देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याआधारे असे सांगितले आहे की मृत्यूनंतर त्या व्यक्तीला कोणत्या पापासाठी शिक्षा मिळते, त्याआधारे असे सांगितले आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर स्वर्ग कि नरक मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मावर आधारलेले असते. (The sin or virtue of human birth decides whether there will be a place in heaven or hell)

1. असे मानले जाते की, ज्यांनी दुसऱ्याचे पैसे लुटले आहेत, त्यांना नरकामध्ये यमदूत दोरीने बांधून इतका मारतो की मारहाण झाल्यावर ती व्यक्ती बेशुद्ध पडते. त्यातून पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा मारहाण केली जाते.

2. जे आपल्या वडिलांचा अपमान करतात किंवा त्यांना घराबाहेर हाकलतात, त्या पापींना नरकात अग्नीमध्ये बुडवले जाते. अशा व्यक्तींची त्वचा काढून टाकेपर्यंत ही शिक्षा दिली जाते.

3. जे लोक आपल्या स्वार्थासाठी निष्पाप प्राण्यांना मारतात त्यांना नरकात खूप कठोर शिक्षा मिळते. अशा पापी लोकांना मोठ्या भांड्यात गरम तेल टाकून तळले जाते.

4. एकमेकांच्या परिस्थितीचा फायदा घेणारे पती-पत्नी एकमेकांच्या पैशाचा फायदा घेईपर्यंतच त्यांच्याबरोबर जगतात, अशा लोकांना नरकात लोखंडी रॉडने मारहाण केली जाते.

5. जे लोक स्वत:च्या आनंदासाठी इतरांचे आनंद काढून घेतात. इतरांची संपत्ती हडप करतात, अशा लोकांना सापांनी भरलेल्या विहिरीत ढकलले जाते.

6. ज्यांचे पती किंवा पत्नीव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत, त्यांच्या अंगावर जळत राहणारा लोखंड टाकला जातो आणि त्यांना मारहाण केली जाते.

7. जे लोक प्राण्यांचे बलिदान देऊन त्यांचे मांस खातात अशा लोकांना नरकात आणले जाते आणि त्यांना प्राण्यांमध्ये सोडले जाते. ते सर्व प्राणी त्यांना फाडून टाकतात आणि खातात.

8. जे पुरुष स्त्रियांवर बलात्कार करतात किंवा महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवून त्यांची फसवणूक करतात. अश लोकांना नरकातही प्राण्यांसारखेच वागवले जाते. त्यांना मलमूत्र आणि मूत्राने भरलेल्या विहिरीत फेकले जाते.

9. आपल्या पदाचा गैरवापर करून निरापराध्यांचा छळ करणाऱ्या लोकांना वैतरणी नदीचे कष्ट भोगावे लागतात. असे मानले जाते की या नदीमध्ये मानवी शरीरे, त्यांची कवटी, सांगाडे आणि रक्त, पू आणि इतर घाणेरड्या गोष्टी असतात.

10. जे लोक जबरदस्तीने साध्या लोकांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात. अशा लोकांना बरेच धोकादायक प्राणी आणि साप असलेल्या विहिरीत फेकले जाते. (The sin or virtue of human birth decides whether there will be a place in heaven or hell)

इतर बातम्या

Maharashtra Flood : महापुरानंतर रोगराई वाढण्याची भीती, लेप्टो, डेंग्यूसह अन्य आजार पसरु नये म्हणून मेडिकल कॅम्प उभारले जाणार- अमित देशमुख

झारखंडचं सरकार पाडण्याच्या कटात चंद्रशेखर बावनकुळेंचा हात?; बावनकुळे म्हणतात…

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ