AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील दैनंदिन पूजेचे हे आहेत खास नियम; अशा पूजेमुळे मिळते तत्काळ फळ

रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. शक्य असल्यास, आपण ते पाचवेळा देखील करू शकता. तसे दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे.

घरातील दैनंदिन पूजेचे हे आहेत खास नियम; अशा पूजेमुळे मिळते तत्काळ फळ
घरातील दैनंदिन पूजेचे हे आहेत खास नियम
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 7:41 AM
Share

मुंबई : सनातन परंपरेत पूजेला विशेष महत्त्व आहे. दरदिवशी देवाची पूजा करण्यासाठी काही नियम देखील आहेत, जे प्रत्येक साधकाने पाळले पाहिजेत. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी वापरलेली मुद्रा, हवन विधी, पूजेचा मंत्र आणि पठण करण्याची पद्धत, आपल्या देवतेसमोर दिवा लावण्याचा किंवा आरती करण्याचा नियम इत्यादीची संपूर्ण माहिती साधकाकडे असायला पाहिजे. (These are the special rules of daily worship at home; Such worship yields immediate effects)

1. नेहमी आंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंत:करणाने देवाची पूजा केली पाहिजे.

2. आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे. जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून पूजा करावी.

3. देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे.

4. आपल्या दैवतेची पूजा नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे. पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी.

5. तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवतांना पातळ चंदन लावू नये.

6. देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये.

7. दररोज पंचदेव – सूर्य, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि श्री विष्णू देवाची पूजा केली पाहिजे.

8. रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. शक्य असल्यास, आपण ते पाचवेळा देखील करू शकता. तसे दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे.

9. नेहमी उभी राहून आरती करा आणि प्रथम ती आरती आपल्या दैवताच्या पायाकडे चारवेळा, नंतर दोनदा नाभीच्या दिशेने आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने ओवाळा. हे एकूण सात वेळा करा. आरती केल्यानंतर त्यातून पाणी फिरवा आणि प्रसादाच्या स्वरूपात सर्व लोकांवर शिंपडा.

10. आसन केल्याशिवाय पूजा करू नये. पूजेनंतर आपल्या आसनाखाली दोन थेंब पाणी ओता आणि कपाळावर लावा व नंतरच जागेवरून उठा. अन्यथा तुम्ही केलेल्या पूजेचे फळ देवराज इंद्राकडे जाते. (These are the special rules of daily worship at home; Such worship yields immediate effects)

इतर बातम्या

Video | क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बनला रजिनकांत, केला ऐश्वर्या रायसोबत धमाकेदार डान्स

युरोपात कोरोनाचा कहर, डिसेंबरपर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; WHO ला भीती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.