AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी पितृपक्षात हे एक काम नक्की करा, तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ होतील.

पितृपक्षात पूर्वजांना श्रद्धांजली वाहून त्यांचे आशीर्वाद मिळवणे सर्वात जास्त महत्त्वाचे आणि सोपेही असते. काही उपायांनी तुम्ही तुमच्या पित्रांचे आशीर्वाद नक्कीच मिळवू शकता. तसेच आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी सर्वपितृ अमावस्येला फक्त एक काम करा. तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी पितृपक्षात हे एक काम नक्की करा, तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ होतील.
To attract financial prosperitydo this work in Pitru PakshaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2025 | 6:00 PM
Share

7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्ष सुरु झाला आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. हा काळ पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. तसेच हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व असते. पितृपक्ष 21 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. सर्व पितृ अमावस्येला हा काळ संपणार आहे.

पित्रांचे आशीर्वाद मिळवायचे असतील, आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील , तर हा  उपाय 

पौराणिक मान्यतेनुसार, या काळात लोक त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद वर्षाव होतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले नाही तर पूर्वज नाराज होऊ शकतात. ज्यामुळे जीवनात पितृदोष निर्माण होऊ शकतो. पण जर तुम्हाला तुमच्या पित्रांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तसेच आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील , तर एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. एवढंच नाही तर त्यामुळे पितृदोषापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते.

दक्षिणेकडे तोंड करून पाणी अर्पण करा

पितृपक्षात दररोज किंवा तुम्हाला जसे जमेल तसे पूर्वजांना पाणी अर्पण करणे चांगले मानले जाते. पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे तोंड करावे, कारण ही पूर्वजांची दिशा मानली जाते. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी पितृपक्षात हे एक काम नक्की करा

सर्व पितृ अमावस्येला करा हा विशेष उपाय

पितृपक्षाचा शेवटचा दिवस, सर्व पितृ अमावस्या, याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ज्या पूर्वजांची मृत्यु तारीख माहित नसली तरीही त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. या दिवशी जर तुम्ही हे एक काम केलं तर नक्कीच तुमच्या पित्रांचा तुमच्यावर आशीर्वाद राहिल. ते म्हणजे या दिवशी पाच गरीब किंवा गरजू लोकांना प्रत्येकी 3 किलो तांदूळ दान करावे. किंवा तुम्हाला जमेल त्या प्रमाणात तांदूळ दान करावे. ते शुभ मानले जाते.

आर्थिक अडथळे दूर होतील

दान करण्यापूर्वी, तुमच्या पूर्वजांचे स्मरण मात्र नक्की करा आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थनाही करा. असे मानले जाते की या उपायाने कुटुंबातील आर्थिक समस्या दूर होतात, घरात शांती आणि आनंद येतो आणि मुख्य म्हणजे तुमचे आर्थिक अडथळे दूर होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.