Today Aashadhi Ekadashi: अशाप्रकारे घरच्याघरी करा आषाढी एकादशीची पूजा; विधी आणि महत्त्व

आज आषाढी एकादशी (Today Aashadhi Ekadashi) आहे. गेल्या आळंदी, देहू, शेगाव अशा ठिकठिकाणाहून वारकरी (Pandharpur wari 2022) विठू माऊलीच्या दर्शनासाठी (vitthal darshan) काल पंढरपुरात दाखल झाले. आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नागरीत वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून ज्या विठुरायाच्या दर्शनाची आस लावून मजल दर मजल करत पंढरपूर जवळ करणाऱ्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच […]

Today Aashadhi Ekadashi: अशाप्रकारे घरच्याघरी करा आषाढी एकादशीची पूजा; विधी आणि महत्त्व
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 5:10 AM

आज आषाढी एकादशी (Today Aashadhi Ekadashi) आहे. गेल्या आळंदी, देहू, शेगाव अशा ठिकठिकाणाहून वारकरी (Pandharpur wari 2022) विठू माऊलीच्या दर्शनासाठी (vitthal darshan) काल पंढरपुरात दाखल झाले. आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नागरीत वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून ज्या विठुरायाच्या दर्शनाची आस लावून मजल दर मजल करत पंढरपूर जवळ करणाऱ्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लावली आहे. कोरोनाकाळात दोन वर्ष विठुरायाचे दर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे यंदाच्या आषाढी एकादशीला अनेकांनी आवर्जून पंढरपूरला हजेरी लावली आहे. याशिवाय तुमच्या आमच्या सारखा एक मोठा वर्ग घरूनच विठुरायाचे स्मरण करीत आहे. आषाढी एकादशी निमित्त आपण घरच्या घरी पूजा करून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊ शकतो.

आजच्या दिवशी हा संपूर्ण उपवास करायचा असतो. उपवासाचे पदार्थ किंवा फळं खायला काही हरकत नाही. स्नान आदी आटोपून घरच्या देवाची पूजा करावी. घरी विठूरायाची मूर्ती असल्यास तिला पंचामृताने स्नान घालावे. मूर्ती व्यवस्थित पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावावा.

मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करावे. हार घालावा. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आणि विठूरायाची आरती करावी. या दिवशी तुळस तोडू नये. आजपासून चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात.

हे सुद्धा वाचा

या चार महिण्यासाठी सृष्टीचा भार भगवान शंकर सांभाळत असतात. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना करावी. त्यानंतर काहीच दिवसात श्रावणास प्रारंभ होतो. श्रावण महिना (Sawan Month) हा पावसाचा महिना असतो. पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतुचे आगमन होते. म्हणजेच चातुर्मासात ऋतूत बदल होत असतात. ऋतुबदलानुसार आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार पसरतात. सर्व भाज्या, फळे यांमध्ये बॅक्टेरिया आणि किड लागते. पावसामुळे सामान्य जनजीवन थोडे विस्कळीत होते आणि गृहकेंद्रित होते. या सर्व कारणांमुळेच या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य करत नाहीत, खाण्या-पिण्याची काळजी घेण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.