Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणात घराबाहेर पडणे धोकादायक? होणार पूर्ण काळोखा?, महत्वाची माहिती…
Total Lunar Eclipse Blood Moon 2025 : आज रात्री ग्रहणाला सुरूवात होणार आहे. हे ग्रहण काहीवेळ राहणार आहे. काही लोक ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडणे टाळतात, खरोखरच ग्रहणात घराबाहेर पडू नये का? याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

आज अत्यंत मोठा दिवस असून यंदाच्या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण आज आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण तब्बल 3 तास 28 मिनिटे 2 सेकंद चालणार आहे. भारतात या ग्रहणाबद्दल अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत. हेच नाही तर लोक ग्रहणाच्यावेळी झोपत नाहीत. शिवाय देवाच्या मंदिराला देखील ग्रहणाच्यावेळी हात लावू नये, असे सांगितले जाते. हेच नाही तर हे ग्रहण पाहण्यासाठी लोकांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतंय. हे ग्रहण आपण थेट पणे बघू शकतो. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडणे धोकादायक आहे. हे ग्रहण आज (7 सप्टेंबर 2025) रात्री 9:58 वाजता सुरू होईल आणि पहाटे 1:26 पर्यंत चालेल. सुतक काळ दुपारीच सुरू होईल.
यंदाचे ग्रहण हे पूर्णग्रहण असल्याने चंद्र हा पूर्णपणे भगव्या रंगाचा होईल. यादरम्यान अनेक मोठे बदल आपलयाला चंद्रात बघायला मिळतील. काही लोक ग्रहणाच्या काळात घराबाहेर अजिबात पडत नाहीत, तो वेळ अशुभ असल्याचे बोलले जाते. याशिवाय ग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर हानिकारक किरणे पसरतात. म्हणून घरातच राहावे सांगितले जाते. मात्र, खरोखरच असे होते का? हे जाणून घेऊयात.
ग्रहणात घराबाहेर पडणे किंवा एखादे काम करणे चुकीचे असल्याचे म्हणणे एकदम खोटे असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हणणे आहे. चंद्रग्रहणात देखील आपण घराबाहेर पडू शकतो. फक्त चंद्रात सतत बदल होत असल्याने प्रकाश कमी जास्त होतो. सूर्यग्रहण हे दिवसा होते. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा तो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यापासून रोखतो. ग्रहणाच्या वेळी, दिवसा वातावरण अचानक अंधारमय होते. दुसरीकडे चंद्रग्रहण फक्त रात्रीच होते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा त्याची सावली चंद्रावर पडते.
रात्र तशीच राहते, चंद्र हळूहळू लाल किंवा काळा दिसतो. यालाच ब्लड मून म्हणतात. चंद्रप्रकाश कमी झाल्यामुळे, आकाश आणि चांदण्या अधिक स्पष्ट दिसतात. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येते. कारण कोणतेही हानिकारक किरणे नसतात. यामुळे रात्री देखील चंद्रग्रहणात तुम्ही घराच्या बाहेर आरामात पडू शकता.
