जगात 6 मिनिटं पसरणार अंधार, शतकातील सर्वात मोठे सुर्यग्रहण केव्हा होणार ? तारीख काय?
या सुर्यग्रहणात चंद्र संपूर्णपणे सुर्याला झाकणार असल्याने सुर्याचा प्रकाश पृथ्वीवर दिसणार नाही त्यामुळे सहा मिनिटांचा अंधार पसरुन पक्षी घरट्याकडे परततील आणि ग्रह तारे देखील दिवसा दिसतील असे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर एक दावा व्हायरल केला जात आहे. त्यात म्हटले आहे की २ ऑगस्ट २०२५ चे जगात सहा मिनिटांसाठी अंधार पडणार आहे. अशी घटना १०० वर्षांतून एकदा होते असेही या दाव्यात म्हटले आहे. परंतू हा दावा अपुरा आहे. कारण अशी घटना होणार तर आहे परंतू ती २ ऑगस्टला नाही. तर ही घटना एका दुर्लभ सुर्यग्रहणासंदर्भातील आहे. हा शतकातील सर्वात मोठे सुर्यग्रहण म्हटले जात आहे. आता अमेरिकेच्या नासा स्पेश एजन्सीने या दाव्या संदर्भात स्पष्टीकरण केले आहे आणि ही खगोलीय घटना कधी होणार ते सांगितले आहे.
शतकातील सर्वात मोठे पूर्ण सुर्यग्रहण
नासाने दिलेल्या माहितीनुसार हे दुर्लभ सुर्यग्रहण २०२५ च्या ऐवजी दोन वर्षांनंतर २ ऑगस्ट २०२७ रोजी आहे. या दिवशी चंद्राची छाया युरोप, उत्तरी आफ्रीका आणि मध्य पूर्वेच्या काही भागात पडणार आहे. ही एक दुर्लभ खगोलिय घटना असणार आहे. २ ऑगस्ट २०२७ ला होणारे पूर्ण सुर्यग्रहण शतकातील मोठे ग्रहण म्हणता येईल. यामुळे पृथ्वीवर तब्बल ६ मिनिटं २२ सेंकद अंधार पडणार आहे. हे शतकातील दीर्घकाळ चालणारे सुर्यग्रहण असेल. १९९१ नंतर असे घडलेले नाही. आणि पुढे २११४ पर्यंत असे पुन्हा पाहाता येणार नाही.
हे ग्रहण सुमारे २५८ किलोमीटर रुंद पट्ट्यात पृथ्वीवासियांना दिसेल आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १५,२२७ किलोमीटर हिश्श्याला ते कव्हर करेल. नासाच्या मते हे सुर्यग्रहण स्पेन, झिब्राल्टर, मोरक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, सुदान, सौदी अरब, येमेन आणि सोमालिया सह ११ देशातील काही भागातून दिसणार आहे.
या भागातून दिसणार आहे ग्रहण
हे एक महत्वाचे खग्रास सुर्यग्रहण असेल. परंतू पृथ्वीच्या केवळ एका छोट्या भागास प्रभावित करेल. ग्रहण ज्या मार्गावरुन जाणार आहे. त्या भागात दिवसाचा अंधार पसरेल तर आफ्रीका, युरोप आणि दक्षिण आशियाच्या अधिकांशा भागात ते आंशिक स्वरुपात दिसेल. उत्तर अमेरिका आणि जगातील दुसऱ्या भागात ( भारत ) ग्रहण दिसणार नाही.
2025 मध्ये कधी आहे सूर्यग्रहण?
साल 2025 चे पुढचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.हे खंडग्रास सुर्यग्रहण अशून चंद्र सुर्याला आंशिक रुपाने झाकणार आहे.सुर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत तंतोतंत न आल्याने असे ग्रहण दिसणार आहे. त्यात सूर्याचा काही भाग कापल्या सारखा दिसणार आहे, यावेळी सुर्य अर्ध चंद्रकोरी प्रमाणे दिसणार आहे.
