Vastu Shastra : घरात या दिशेला कधीच नसावं कोरफडीचं रोप, वास्तुशास्त्र कायं सांगतं?
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषावर विविध उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात असलेली एखादी मूर्ती किंवा एखादं झाडं हे जर चुकीच्या दिशेला असेल तर त्यामुळे वस्तुदोष निर्माण होऊ शकतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

आपण अनेकदा आपल्या घरात, बालकनीमध्ये किंवा घराजवळ बागेत विविध प्रकारचे झाडं लावतो. मात्र वास्तुशास्त्रात कोणती झाडं लावावीत? कोणती झाडं लावू नयेत, तसेच तुम्ही जी झाडं घरात लावली आहेत, त्याची योग्य दिशा कोणती? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं अशी असतात की ती अत्यंत शुभ असतात, जेव्हा आपण ही झाडं लावतो, तेव्हा त्यातून सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि त्याचा परिणाम हा आपल्या कुटुंबावर होतो. कुटुंबात आनंदी वातावरण राहतं, परंतु ही झाडं नेहमी योग्य दिशेलाच लावली गेली पाहिजेत जर या झाडांची दिशा चुकली तर मात्र त्याचा नकारात्मक प्रभाव हा घरावर पडतो, घरात वास्तुदोष निर्माण होतो, आणि एकदा का घरात वास्तुदोष निर्माण झाला की घरात विविध समस्या निर्माण होतात. काही कारण नसताना अचानक भांडणं होणं, आर्थिक समस्या या सारख्या समस्या भेडसावू लागतात. आज आपण कोरफडीच्या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये काही अडी अडचणी येत असतील, तुम्ही नोकरीमध्ये खूप कष्ट करत असाल परंतु अपेक्षित यश मिळत नसेल, मनाप्रमाणे पगार वाढ होत नसेल, बढती मिळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये वास्तुशास्त्रात घरात कोरफड लावण्याचा सल्ला दिला आहे. वास्तुशास्त्रानुसार कोरफड ही वनस्पती अतिशय शुभ आहे, जर घरात कोरफड लावली तर तिचा सकारात्मक परिणाम हा तुमच्यावर आणि तुमच्या घरावर होतो. तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात.
कोरफड लावण्याची योग्य दिशा कोणती?
वास्तुशास्त्रानुसार कोरफडीच्या झाडची लागवड घराच्या नेहमी पश्चिम दिशेला करावी, त्यामुळे तुम्हाला त्याचं शुभ फळ मिळतं, घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. घरात आनंदी वातावरण राहतं, अचानक येणाऱ्या संकटांपासून घराचं संरक्षण होतं. कोरफडीचे जसे अध्यात्मिक उपयोग आहेत,तसेच तिचे अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की कोरफडीचे रोप चुकूनही उत्तर पश्चिम दिशेला लावू नये, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.
