AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: घरात लावा या पक्ष्यांचे फोटो, नशीबच बदलून जाईल, आर्थिक संकटांपासून कायमची सुटका

वास्तुशास्त्रामध्ये काही पक्ष्यांना शुभ माण्यात आलं आहे, जर या पक्ष्यांचे फोटो तुमच्या घरात लावले तर त्यामुळे सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, तसेच घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. आज आपण अशाच काही पक्ष्यांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या पक्ष्यांचे फोटो घरात लावणं हे हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील शुभ माण्यात आलं आहे.

Vastu Shastra: घरात लावा या पक्ष्यांचे फोटो, नशीबच बदलून जाईल, आर्थिक संकटांपासून  कायमची सुटका
Peacock photosImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 21, 2026 | 9:58 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेले वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुमच्या घरात कोणत्याही कारणांमुळे नकारात्मक शक्ती वाढते आणि सकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तेव्हा तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं. यालाच आपण सोप्या भाषेत घरात वास्तुदोष निर्माण झाला असं म्हणतो. कोणत्याही घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर त्याचा निश्चितपणे परिणाम हा त्या घरातील कुटुंब प्रमुखावर तसेच घरातील सदस्यांवर होत असतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माणच होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. वास्तुशास्त्रात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये ज्या प्रमाणे काही झाडं, मूर्ती यांना शुभ माण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही पक्ष्यांना देखील शुभ माण्यात आलं आहे. या पक्ष्यांचे फोटो जर तुम्ही तुमच्या घरात लावले तर तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होऊन तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, आज आपण अशाच काही पक्ष्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मोराचा फोटो – वास्तुशास्त्रामध्ये मोराला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. मोर हा आनंदाचं प्रतिक आहे, तसेच मोर हा सुख, शांतीचं देखील प्रतिक आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातील सुख शांती नष्ट झाली आहे, घरात वातावरण कायम अशांत आहे, अशावेळी तुम्ही तुमच्या घरात मोराचा फोटो लावावा असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात मोराचा फोटो लावतात तेव्हा सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात, एवढंच नाही तर कोणत्याही कारणांमुळे तुमच्या घरात भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील तर ती समस्या देखील दूर होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

निळकंठाचा फोटो – वास्तुशास्त्रामध्ये घरात निळकंठ पक्ष्याचा फोटो लावणं हे देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. ज्या घरात निळकंठ पक्ष्याचा फोटो असतो, त्याव घरावर सदैव भगवान महादेव यांचा आशीर्वाद राहतो, असं मानलं जातं. निळकंठ पक्ष्याला सुख, समृद्धी आणि शांतीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ज्या घरात निळकंठ पक्ष्याचा फोटो असतो, त्या घराची भरभराट होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना