.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं? चीडचीड होते? मग बेडपासून या 5 गोष्टी दूर ठेवा

तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल की झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटतं, तुमची चिडचिड होते. तुमच्या घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्यासोबत असं घडू शकतं. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं? चीडचीड होते? मग बेडपासून या 5 गोष्टी दूर ठेवा
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 9:23 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर अचानक आपल्या अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे आपली चिडचिड देखील होते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की असं नेमकं कशामुळे होत असेल? वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपास ज्या वस्तू असतात, त्या वस्तूंचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही वस्तू या सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा आपल्यावर चांगला प्रभाव पडतो, मात्र काही वस्तू या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर तुमच्या दिवसाची सुरुवातच अशा नकारात्मक ऊर्जेनं झाली तर संपूर्ण दिवस तुमच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतो. दिवसभर तुमच्या मनात नकारात्मक विचार येत राहतात. मात्र जर तुमच्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक ऊर्जेनं झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

बेडची दिशा – तु्मच्या बेडची दिशा कशी आहे, याचा देखील मोठा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडची दिशा ही नेहमी दक्षिण पश्चिम अशीच असावी. यामुळे तुमच्या बेडरूममध्ये सतत सकारात्मक ऊर्जा राहते, आणि तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर अस्वस्थ वाटत नाही.

लोखंडाचं सामान – बेडच्या आसपास कधीही लोखंडाच्या वस्तू ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. अनेक लोकांना बेडखाली लोखंडाच्या जड वस्तू ठेवण्याची सवय असते. मात्र या सवयीमुळे बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे बेडपासून लोखंडाच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

झाडू – अनेक लोकांना बेडखाली किंवा बेडच्या आजूबाजूला झाडू ठेवण्याची सवय असते, मात्र यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतोच. तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटतं, त्यामुळे झाडू कधीही तुमच्या बेडजवळ ठेवू नका, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

दागिने ठेवू नका- वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडजवळ किंवा उशाखाली कधीही दागिने ठेवू नका, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

पानी – अनेक लोकांना बेडजवळ पाणी ठेवण्याची सवय असते, मात्र यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर