AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : जेवताना कधीच करू नका ही चूक, अन्यथा पश्चाताप कराल…

वास्तुशास्त्रामध्ये जेवणाचा संबंध हा ऊर्जेशी जोडलेला आहे, आपण अन्नाचं सेवन करतो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, मात्र जेवण करताना अशा काही गोष्टी असतात ज्याचं पालन न कल्यास सकारात्मक ऊर्जेचं परिवर्तन हे नकारात्माक ऊर्जेमध्ये होतं. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra : जेवताना कधीच करू नका ही चूक, अन्यथा पश्चाताप कराल...
foodImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 26, 2026 | 8:04 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार जेवणाचा संबंध हा ऊर्जेशी जोडला गेलेला आहे, म्हणजे आपण जे काही जेवण करतो, त्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र अनेकजण जेवताना योग्य त्या नियमांचं पालन करत नाहीत, चुकीच्या पद्धतीने जेवतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर विविध समस्या निर्माण होतात. जसं की घरावर कर्ज वाढतं, काहीही कारण नसताना भांडणं होतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे असे वास्तुदोष टाळण्यासाठी योग्य पद्धतीने जेवणं करणं गरजेचं असतं. वास्तुशास्त्रात असं देखील म्हटलं आहे की, आपण कोणत्या प्रकारचं अन्न सेवन करतो? त्यावर आपला स्वभाव देखील अवलंबून असतो. चला तर मग जाणून घेऊयात जेवताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?

वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने कधीही एका ताटामध्ये जेवू नये, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात गृहकलह वाढतो. वास्तुशास्त्रानुसार कुंटुबातील प्रत्येक व्यक्तीची एक जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असते, घरातील जो कुटुंब प्रमुख असतो, त्याच्यावर आपल्या पत्नीसोबतच घरातील सर्व सदस्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते. अशा परिस्थितीमध्ये जर कुटुंब प्रमुख आणि त्याची पत्नी जर एका ताटात जेवले तर अशा वेळी कुटुंब प्रमुखाचं त्याच्या पत्नीवर असलेलं प्रेम तर वाढतं, मात्र कुटुंबातील इतर सदस्यांकडे त्याचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वाद विवाद होतात, भांडणं होतात. त्यामुळे कधीही पत्नीसोबत एका ताटात जेवू नये, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

ज्या प्रमाणे पती आणि पत्नीने एका ताटात जेऊ नये, त्याचप्रमाणे कधीही बेडवर बसून सुद्ध जेवू नये, असं केल्यास तो अन्नाचा अपमान समजला जातो, त्यामुळे घरात अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण होतात. तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात देखील सापडू शकता, घरात बरकत राहत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.