Vastu Shastra : अशा घरावर सदैव राहतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद, कधीच नसते पैशांची कमी
तुमचं घर कसं असावं? याबद्दल वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर अशा घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, घराची आर्थिक स्थिती उत्तम राहते, तसेच घरातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य देखील उत्तम राहतं.

तुमचं घर कसं असावं? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेपासून ते तुमच्या घरातील पाण्याची टाकी कोणत्या दिशेला असावी? इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. हेच टाळण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन तुमची प्रगती होईल. तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील.
घराचा मुख्य दरवाजा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असावा, जर उत्तर दिशेला असेल तरी चालेल मात्र तो कधीही दक्षिण दिशेला असू नये. घराचा दरवाजा हा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहतो, घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, त्यामुळे वास्तुदोषापासून तुमचा बचाव होतो.
स्वयंपाक घर- वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हे नेहमी अग्नेय दिशेला असावं. कारण अग्नेय दिशा ही अग्नी देवतांची दिशा आहे. त्यामुळे तुमचं किचन जर अग्नेय दिशेला असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतात. घरात बरकत राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची उत्तर दिशा ही देखील अत्यंत महत्त्वाची असते, उत्तर दिशा ही धनाची दिशा असते, तसेच ती धनाची देवात कुबेर यांची देखील आवडती दिशा आहे. त्यामुळे तुमच्या घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, त्या दिशेला कधीही कचरा किंवा इतर भंगार सामान टाकू नये, तसेच घराच्या उत्तर दिशेला भिंतीवर कुबेरांचा फोटो लावावा. तुमच्या घराची तिजोरी देखील उत्तर दिशेला असावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
