Vastu Shastra : ही आहेत पैसा देणारी झाडं, तुमच्या घरात आहेत का? नसतील तर मग आजच लावा
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही अत्यंत शुभ मानली गेली आहेत, ही झाडं जर घरात असतील तर आर्थिक बरकत येते. जर कर्ज असेल तर ते कमी होतं, असं वास्तुशास्त्र सांगतं, अशाच काही झाडांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जी घरात लावणं शुभ मानलं जातं.

प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाला प्रचंड महत्त्व असते, आपण पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट करतो, दिवसरात्र मेहनत करतो. तेव्हा कुठे आपल्याला पैसा मिळतो, परंतु अनेकांसोबत असं घडतं की कितीही पैसा कमवला तरी तो हातात टिकत नाही, तो कोणत्या न कोणत्या प्रकारे खर्च होतो. त्यामुळे खूप मेहनत करून देखील आर्थिक संकटं कायम राहतात. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. मात्र जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल तरी देखील तुम्हाला ही समस्या जाणवू शकते, घरातील वास्तुदोष दूर होऊन आर्थिक प्रगती व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असातत जी घरात लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं, त्यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, हातात आलेला पैसा तिजोरीमध्ये टिकून राहतो, खर्चाला आळा बसतो.
मनीप्लांट – मनीप्लांटचा वेल हा दिसायला खूप आकर्षक असतो, तो आपल्या घराची शोभा वाढवतो, हा वेल तुम्ही तुमच्या बालकनीमध्ये किंवा घरात असा कुठेही लावू शकता. वास्तुशास्त्र आणि फेंगशुई दोन्हीमध्ये देखील मनीप्लांटला शुभ मानलं गेलं आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या अग्नेय दिशेला मनीप्लांटचा वेल लावला तर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसू लागतात, घरात आर्थिक स्थैर्य राहते, आर्थिक संकटं कमी होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
तुळस – तुळही ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत प्रिय झाडं आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरात कधीही पैशांची कमी राहत नाही. त्या घरावर सदैव माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असतो, त्यामुळे घराची आर्थिक भरभराट होते, सुख, शांती आणि समृद्धी येते, त्यामुळे रोज सकाळी तुळशीची पूजा करावी, तसेच सायंकाळच्यावेळी तुळशी जवळ दिवा लावावा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
शमी – शमीचं झाडं हे देखील घरात लावणं अत्यंत शुभ मानण्यात आलं आहे, ज्या घरात शमीचं झाडं असतं, त्या घरात सदैव पैसा टिकून राहवतो, तसेच शमीच्या झाडामुळे शनीदोष देखील दूर होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
