AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर

अनेकदा असं होतं की आपल्या घरात काहीही कारण नसताना वाद होतात, घरातील वातावरण नकारात्मक बनतं. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो हातात टिकत नाही. यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही सोप्या उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 9:03 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपण प्रचंड कष्ट करतो, खूप पैसे कमावतो परंतु हातात पैसा टिकत नाही. हातात जसे पैसे येतात तसे ते खर्च होतात. घरात बरकत राहत नाही, आर्थिक स्थैर्य लाभत नाही. या सर्व प्रकारच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय जर तुम्ही दररोज केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. पूर्वीच्या काळी अनेकजण हे उपाय करत होते, त्यामुळे त्या काळात पैसा कमी होता, मात्र आर्थिक बरकत होती. लोक सुखी समाधानी होते. परंतु आता हातात प्रचंड पैसा येतो, मात्र तो टिकत नाही. लोक सुखी समाधानी असलेले दिसून येत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठल्या नं कुठल्या गोष्टीचा तणाव दिसून येतो. यासाठीच वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

हळदीचा उपाय – स्वयंपाक घरात तुम्ही ज्या डब्यामध्ये तांदूळ ठेवता, त्या डब्यात तीन हळकुंड ठेवा. यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरू कमजोर असेल तर तो मजबूत होईल. गुरूची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुमचे सर्व कष्ट दूर होतील. तसेच जर घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होत असतील तर ती देखील समस्या दूर होईल.

दिवा – सकाळी तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्यावेळी स्वंयपाक घरात देखील एक दिवा ठेवा, यामुळे घरात बरकत येते, अन्नधान्य कधीही कमी पडत नाही. अन्नपूर्णा मातेचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहतो. तसेच कुठेही दिवा लावता एक विशेष काळजी घेतली पाहिजे, दिवा कधीही जमिनीवर लावू नका, तर दिव्याखाली थोडे तांदूळ ठेवा. किंवा एखादं फूल ठेवा, तुम्ही एखाद्या ताटलीमध्ये ठेवून देखील दिवा लावू शकता. यामुळे घरात पैशांची आवक वाढते.

जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. एक काचेचे भांडं घ्या, त्यामध्ये थोडं मीठ आणि लवंगा ठेवा, यामुळे सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुम्ही ज्या डब्यामध्ये पीठ ठेवता, त्या डब्यामध्ये दर शनिवारी थोडे हारभारे ठेवा, यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,