Vastu Shastra : झटक्यात दूर होईल वास्तुदोष, फक्त मंगळवारी आणि शनिवारी करा हा सोपा उपाय
आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की सर्व सुरळीत सुरू असतं, अन् मग अचानक एका मागून एक संकटांची मालिका सुरू होते, त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. आज आपण वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की घरात सगळं सुरळीत सुरू असतं, मात्र त्यानंतर अचानक घरावर संकटं येण्यास सुरुवात होतात. आपली आर्थिक परिस्थिती खालावते, कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, काहीही कारण नसताना घरात गृहकलह वाढतो, पती -पत्नीमध्ये भांडणं होतात. कधी-कधी ही परिस्थिती एवढी नियंत्रणाबाहेर जाते की गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचते, या गोष्टी का घडतात? तर त्यासाठी अनेक कारण असू शकतात, मात्र जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल तरी देखील तुम्हाला या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपण अनेकदा अशा काही छोट्या -छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. आज आपण घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तूदोष दूर होऊन, तुमची सर्व संकटातून सुटका होईल.
मंगळवारी आणि शनिवारी करा हा सोपा उपाय
हिंदू धर्मशास्त्रानुसार मंगळवार हा वार भगवान हनुमान यांना समर्पित आहे, तर शनिवार हा भगवान शनि देव यांना समर्पित आहे. त्यामुळे या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा उपाय म्हणजे दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर देवाची पूजा आणि प्रार्थन करा, त्यानंतर घरात देवाजवळ धूप लावा, हा धूप त्यानंतर संपूर्ण घरात फिरवा, यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करावी, तसेच हनुमान चालीसाचा पाठ करावा. तसेच शनिवारी शनि देवाची पूजा करावी, शनि देवांना तेल अर्पण करावं. तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा माराव्यात त्यामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
