AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, नाहीतर व्हाल बरबाद

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला मोठं महत्त्व आहे, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, त्या चुकूनही घरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो, त्या वस्तू कोणत्या आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.

Vastu Tips : घरात चुकूनही ठेवू नका या  5 वस्तू, नाहीतर व्हाल बरबाद
| Updated on: Jul 21, 2025 | 9:36 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? तुमच्या वास्तुची रचना कशी असावी? घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घराचा दरवाजा कोणत्या दिशेला नसावा? स्वंयपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कशी असावी अशा एकना अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

मात्र वास्तुशास्त्र केवळ तुमच्या घराच्या रचनेपुरतचं मर्यादीत नाहीये, तर वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक लाहन, मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचा संबंध हा त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीशी येत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या घरामध्ये काय असावं? काय असू नये? घरात कोणत्या मूर्ती असणं शुभ आहे, कोणत्या मूर्ती अशुभ आहेत, घड्याळाची दिशा कोणती असावी, तुमच्या घरात जर देवी देवतांच्या प्रतिमा असतील तर त्या कोणत्या दिशेला असाव्यात अशा अनेक गोष्टींबाबत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

दरम्यान वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या घरात असणं अशुभ मानलं जातं, जर तुमच्याही घरात या वस्तू असतील तर त्या वस्तू घराच्या बाहेर काढा असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? आणि वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

जुने कपडे – वास्तुशास्त्रानुसार घरात जुने आणि फाटलेले कपडे असता कामा नये, यामुळे तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये बाधा येऊ शकते.

जुनं भंगार सामान – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जुनं आणि भंगार सामान ठेवू नका, ते एक नकारात्मक ऊर्जेच प्रतिक आहे, यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

कचरा –  जर तुमच्याही घरात वारंवार कचरा साचून राहात असेल तर हे अशुभ मानलं जातं, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.

खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू –  जर तुमच्याही घरात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्याला घरात ठेवता कामा नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

बंद घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ हे वाईट वेळेचं प्रतिक असतं, त्यामुळे घरात असं बंद घड्याळ ठेवू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.