Vastu Tips : रात्री करा हे 4 खास उपाय, होईल धनाचा वर्षाव
तुम्ही पैसा खूप कमवतात मात्र हातात पैसा टीकत नाही, पैसा घरात टिकावा यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे तुम्हाला तुमचं घर कसं असावं? यासंदर्भात मार्गदर्शन करतं. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुमच्यावर अनेक संकटं येऊ शकतात. मग ती संकटं कोणतीही असू शकतात, आर्थिक, आरोग्यविषयक, घरात वादविवाद होणं अशा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
त्यामुळे ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे लोक वास्तुशास्त्रानुसारच आपल्या घराची रचना करतात. ते आपल्या घरातील वस्तू देखील वास्तुशास्त्रात सांगितल्या प्रमाणेच ठेवेतात. घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? स्वंयपाक घराची दिशा कोणती असावी? देवघराची दिशा कोणती असावी? जर तुमच्या घरात देवी-देवतांचे फोटो असतील तर त्या फोटोंची दिशा कोणती असावी अशा एकना अनेक विषयांवर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
आपल्यासोबत अनेकदा असं होतं की, आपल्या हातात पैसा मोठ्या प्रमाणात येतो, मात्र तो घरात टिकत नाही, अनावश्यक खर्चात वाढ होते. हे टाळण्यासाठी आणि घरात पैसा टिकण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
घरात दिवा लावा – वास्तुशास्त्रानुसार घरात सायंकाळच्या वेळी नियमितपणे दिवा लावला पाहिजे. ज्या घरात नियमितपणे दिवा लावला जातो, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहातो, तिथे कधीच पैशांची कमी भासत नाही.
तिजोरीच्या जागेवर पवित्र धागा बांधा किंवा ठेवा- यामुळे तुमच्या घरात पैसा टिकून राहातो, अनावश्यक खर्च कमी होतो.
रात्रीच्यावेळी तुळशीजवळ दिवा लावा – सायंकाळच्यावेळी नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावावा, यामुळे सदैव तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहाते, आयुष्यात कधी पैशांची कमी भासत नाही.
हळदीचा टिळा लावा – हळदीचा टिळा अतिशय शुभ मानला जातो, यामुळे पैशांची प्राप्ती होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
