Vastu Tips: तुम्ही पण तुमच्या कपाटात या वस्तू ठेवता का? सावधान व्हाल कंगाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, तुमच्या घरातील कपाटात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी, इथपासून ते तुमचं बेडरूम कोणत्या दिशेला असावं? स्वयंपाक घराची दिशा कोणती असावी, तुम्ही ज्या वस्तू घरात ठेवतात त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात? कोणत्या वस्तू घरात ठेवाव्यात? कोणत्या वस्तू घरात नसाव्यात अशा अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे, धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, जसं की काही कारण नसताना भांडणं, पती-पत्नीमध्ये वाद, कुटुंब कलह, एवढंच नाही तर अचानक आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं, अकस्मात धनहानी, या सारखे संकट तुमच्यावर येऊ शकतात, वास्तुशास्त्राच्या भाषेत यालाच वास्तुदोष असं म्हणतात.
वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो, मात्र तरी देखील आपल्या हातून अशा काही छोट्या-छोट्या चुका होतात, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, हा वास्तुदोष कसा दूर करायचा याबद्दल देखील वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये कपाट असतं, वास्तुशास्त्रामध्ये कपाट कसं असावं? याबाबत देखील काही नियम सांगण्यात आले आहेत, आज आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही घरामध्ये कपाट ही एक महत्त्वाची वस्तू असते. अनेकांच्या घरी कपाटामध्ये तिजोरी असते, त्यामुळे वास्तुशास्त्रात कपाटाला खूप महत्त्व आहे. जर तुमचं कपाट हे स्वच्छ असेल तसेच कपाटामध्ये ठेवलेले कपडे हे अस्तव्यस्त न ठेवता जर व्यवस्थित ठेवले असतील तर वास्तुदोष दूर होऊन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या कपाटामध्ये शुक्र आणि शनि ग्रहाचा प्रभाव असतो. ज्या कपाटात तुमची तिजोरी आहे, त्या कपाटामध्ये कधीही भंगार खराब झालेलं सामान, बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू, बंद घड्याळ, रद्दी अशा वस्तू ठेवू नये, त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या घरावर पडतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
