AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : सासू सुनेचं पटत नाही? नवरा बायकोचे भांडणं होतात? मग घरात हे खास झाड लावाच

जर तुमच्याही घरात सतत भांडणं होत असतील, छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत असतील तर वास्तुशास्त्रात त्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Tips : सासू सुनेचं पटत नाही? नवरा बायकोचे भांडणं होतात? मग घरात हे खास झाड लावाच
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 5:45 PM
Share

तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल, की बऱ्याचवेळेला काही कारण नसताना घरात भांडणं होतात, वादविवाद होतात. त्यामुळे घर अशांत राहातं. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरातील व्यक्तींची आपसात भांडणं होतातं. या सर्वांमुळे घरातील वातावरण बिघडतं. जर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण शांत ठेवायचं असेल, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण टाळायची असतील तर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत, त्यापैकीच एका उपयाची आज आपण माहिती घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, ती जर तुम्ही तुमच्या घरात लावली तर त्यांच्या प्रभावामुळे तुमच्या घरात वातावरण शांत राहातं, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्यातील एका झाडाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

जर तुमच्याही घरात सतत भांडणं होत असतील, घरात शांतता टिकत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोगऱ्याचं झाड लावू शकता. मात्र फक्त मोगऱ्याचं झाड लावून काम होतं असं नाही, तर तुम्ही मोगऱ्याचं झाडं तुमच्या घरात ज्या दिशेला ठेवणार असाल ती दिशा देखील योग्य पाहिजे, तसेच मोगऱ्याच्या झाडाची काळजी देखील योग्य पद्धतीनं घेतली गेली पाहिजे.

मोगरा हे एक असं झाडं आहे, ज्याच्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो, मोगऱ्याच्या फुलांपासून जो सुगंध येतो तो घरातील नकात्माकता दूर करतो, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरातील वातावरण प्रसन्न राहातं. ज्योतिषशास्त्रामध्ये मोगऱ्याला सौभाग्याचं प्रतिक मानलं गेलं आहे. मोगरा घरामध्ये ऊर्जा संतुलनाचं काम करतो.

मोगऱ्याचा संबंध हा शुक्र ग्रह आणि चंद्रशी आहे, असं मानलं जातं. शुक्र हा ग्रह प्रेम, आकर्षण आणि ऐश्वर्याचं प्रतिक आहे, तर दुसरीकडे चंद्र शांतीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे घरामध्ये मोगऱ्याचं झाडं लावणं शुभ मानलं जातं. मोगऱ्यामुळे घरात शांती टिकते आणि भांडणं होत नाहीत असं मानलं जातं. मोगऱ्याचं हे झाडं घरातील उत्तर -पश्चिम दिशाला लावणं शुभ मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.