Vastu Tips : स्वंयपाक घरात रात्रीच्या वेळी फक्त ही एक वस्तु ठेवा, झटक्यात होईल सर्व कर्जातून मुक्ती
कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी घरात धन, धान्य संपदा येण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातील एका उपायाबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे तुमचं घर अर्थात वास्तुशी संबंधित आहे. तुमचं घर कसं असावं, घरात काय-काय असावं? या संदर्भात वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्राला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक संकट येऊ शकतात. अचानक धनहानी, कर्जबाजारीपणा, आरोग्याच्या विविध समस्या, घरात वाद विवाद , भांडणं होणं असे प्रकार तुमच्यासोबत घडू शकतात. अशा संकटांपासून वाचण्यासाठी नेहमी तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार असावी अशी मान्यता आहे.
वास्तुशास्त्रात आदर्श घर कसं असावं याबद्दल सांगण्यात आलं आहे, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा कोणत्या दिशेला असावा? कोणत्या दिशेला नसू नये, स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? तुमची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? घरात कोणत्या वस्तू असाव्यात, कोणत्या नसाव्यात? जर तुमच्या घरात देवघर असेल किंवा देवी देवतांचे फोटो असतील तर त्याची दिशा कोणती असावी? अशा एकना अनेक गोष्टींचं मार्गदर्शन हे वास्तुशास्त्रात करण्यात आलं आहे. ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे लोक नेहमी आपलं घर बांधताना वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घेतात.
दरम्यान अनेकांसोबत असं होतं की, काहीही नसताना आकस्मात मोठं संकट येतं, जस की एखादा आजार, व्यावसायात तोटा अशा प्रकारच्या संकटामुळे व्यक्ती कर्जबाजारी बनते. मात्र वास्तुशास्त्रात कर्जमुक्तीचे देखील काही मार्ग सांगितले आहेत. त्यातीलच एका उपायाबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
वास्तुशास्त्रामध्ये असा एक उपाय सांगण्यात आला आहे, जो उपाय केल्यास तुमच्यावर कितीही कर्ज असेल त्यातून तुमची लवकरात लवकर सुटका होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार रोज रात्री झोपायच्या वेळी तुमच्या स्वयंपाक घराच्या उत्तर बाजुला एक पाण्यानं भरलेला तांब्या झाकून ठेवावा, अशी मान्यता आहे, की असं केल्यानं व्यक्तीला लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळते, घरात समृद्धी येते, धनयोग निर्माण होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
