Vastu Tips | कारमध्ये या 5 गोष्टी ठेवाच, संकट दूर गेलच म्हणून समजा

Vastu Tips | कारमध्ये या 5 गोष्टी ठेवाच, संकट दूर गेलच म्हणून समजा
car

आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्वतःची कार आहे. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार कार खरेदी करतो. कार हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेली आहे. कार खरेदी करताना आपण तिच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष देतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 11, 2021 | 11:26 AM

मुंबई : आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्वतःची कार आहे. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार कार खरेदी करतो. कार हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेली आहे. कार खरेदी करताना आपण तिच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष देतो. पण कार खरेदी करताना तुम्हा काही वास्तु टिप्स देखील लक्षात घ्यायला हव्यात. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि येणारे संकट टळते. आणि तुमचा प्रवास सुखकर होतो. चला जाणून तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

देवाच्या मूर्ती
प्रत्येकजण गाडीत देव वगैरेचा फोटो लावतो. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची छोटी मूर्ती ठेवणे सर्वात शुभ असते. गणपतीचा संबंध केतूशी आहे. अशा वेळी गाडीत गणेशमूर्ती असल्यास अपघातापासून वाचू शकतो. अशी मान्यता आहे.

कासव
जर तुम्ही तुमच्या कारमध्ये एक लहान काळे कासव ठेवले असेल तर ते खूप शुभ असते. वास्तुशास्त्रानुसार, कासव नकारात्मक ऊर्जा काढून टाकते.

तेल
वास्तूनुसार कारमध्ये आवश्यक तेलाची छोटीशी कुपी ठेवल्याने सकारात्मकता येते. त्यामुळे मन शांत आणि उत्साही होते.

रॉक मीठ
गाडीच्या सीटखाली खडे मीठ बांधून ठेवा. वर्तमानपत्रावर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी हे वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी बदला. असे मानले जाते की ते नकारात्मक ऊर्जा शोषण्याचे काम करते.

तिबेटी ध्वज
तिबेटी ध्वज प्रत्यक्षात समृद्धीचे प्रतीक आहेत. वास्तुशास्त्रानुसार हे ध्वज कारमध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. हवेत उडत असताना ते आपल्या सभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Flat Vastu Rules | नवीन वर्षात घर घेताय? मग हे वास्तू नियम लक्षात ठेवा भरभराट नक्की होणार

Chanakya Niti | भरपूर पैसा, सुखी आयुष्याच्या शोधात आहात, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कधी विसरु नका


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें