Vastu Tips : घरात लाल घोड्याची मूर्ती ठेवण्याचे आहेत फायदेच -फायदे, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, की ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, त्यातीलच एका उपयाची आज आपण माहिती घेणार आहोत.

जर तुम्ही काही काम करत असाल, व्यापार, नोकरी किंवा एखादा छोटा-मोठा उद्योग, तसं या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे पैसा. तुमच्या काम करण्याची प्रेरणाच पैसा असते. जर तुम्ही व्यापार करत आहात, तुमची एखाद्या वस्तुच्या निर्मितीची फॅक्टरी आहे. तुम्ही वस्तू विकत आहात, पण तुम्हाला तुमचा पैसा वेळेवर मिळत नाहीये, मार्केटमध्ये तुमचा पैसा अडकून पडला आहे. त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडला आहात. तर अशा स्थितीमध्ये वास्तुशास्त्रात सांगितलेले काही उपाय करणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला तुमचा पैसा परत मिळेल, तुमची आर्थिक संकटातून सुटका होईल. जाणून घेऊयात यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले खास उपाय नेमके कोणते आहेत, आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
दक्षिण -पूर्ण दिशेला धनाचं केंद्र
तुमच्या घरातील दक्षिण-पूर्ण दिशा ही खूप महत्त्वाची असते. कारण या दिशेचा संबंध थेट धनाशी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या दिशेला नेहमी जास्तीत -जास्त सकारात्मक ऊर्जा कशी राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं, वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले छोटे-छोटे उपाय तुम्ही यासाठी करू शकता. त्यामुळे तुमचं मार्केटमध्ये अडकलेलं पेमेंट तुम्हाला मिळण्यास मदत होईल.
करा हे सोपे उपाय
लाल घोड्याची मूर्ती किंवा प्रतिमा लावा
घरात लाल घोड्याची मूर्ती असणं खूप शुभ मानलं जातं. या मूर्तीसाठी किंवा प्रतिमेसाठी फार पैसे खर्च होत नाहीत. तुम्ही लाल घोड्याची प्रतिमा एखाद्या पेंटिंग स्टोअरमधून किंवा ऑनलाईन साईटवरून खरेदी करू शकता. पळणाऱ्या चार किंवा सात घोड्यांची प्रतिमा तुम्ही घरी आणू शकता. मात्र मूर्ती किंवा प्रतिमा खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे घोडे एकाच दिशेनं पळताना दिसले पाहिजेत.
दक्षिण -पूर्व दिशेला लावा
दक्षिण-पूर्व दिशेला धनाचं केंद्र मानलं जातं. त्यामुळे या दिशेला सतत सकारात्मक ऊर्जा असणं गरजेचं असतं. त्यामुळे तु्म्ही ही लाल घोड्याची मूर्ती किंवा प्रतिमा दक्षिण -पूर्व दिशेला ठेवा. यामुळे तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहील आणि तुम्हाला कधीही पैशांची कमी भासणार नाही.
घर स्वच्छ ठेवा
वास्तुशास्त्रानुसार घर नेहमी स्वच्छ असलं पाहिजे, घरात स्वच्छता नसेल तर नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जर तुमचं घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो आणि तुमची प्रगती होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
