Vastu Tips : घराच्या उंबरठ्यावर लावा ही छोटीशी गोष्ट, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत
आपल्या काही चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात, हे वास्तुदोष कसे दूर करायचे? वास्तुदोषामुळे घरात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा कशी नष्ट करायची? याबाबत वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, आज आपण अशाच एका सोप्या उपायाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे तुमच्या घराशी संबंधित एक शास्त्र आहे, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे. तसेच आपण आपल्या रोजच्या आयुष्यात देखील काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोषामुळे अचानक धनहानी, आरोग्याच्या समस्या, गृहकलह अशा समस्या निर्माण होऊ शकतात, वास्तुदोष कसा दूर करायचा? यासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार या उपायामुळे तुमच्या घराचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून तर संरक्षण होतच पण तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी राहत नाही. चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या उपायाबाबत
वास्तुशास्त्रानुसार घोड्याच्या नालीला सर्वात पवित्र मानलं जातं, घोड्याची नाल म्हणजे घोड्याला पळताना काही दुखापत होऊ नये, त्याचे पाय घसरू नये, यासाठी त्याच्या पायाला अर्धगोल आकाराची एक लोखंडी पट्टी ठोकलेली असते. जेव्हा ही पट्टी घोड्याच्या पायातून निघून पडते, तेव्हा ही नाल तुम्ही जर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठोकली तर सर्व प्रकारच्या वाईट शक्तिपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं. कोणाचीही नजर तुमच्या घराला लागत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर घोड्याची नाल ठोकलेली असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही, घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
पैशांची समस्या होते दूर – वास्तुशास्त्रात असं देखील म्हटलं गेलं आहे की, ज्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर घोड्याची नाल असते, त्या घरात कधीही पैशांची अडचण भासत नाही. त्या घरातील तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहते. असे घोड्याच्या नालीचे अनेक फायदे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. ज्या घरात घोड्याची नाल असते, त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा नसते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
