Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजा समोर चुकूनही असू नयेत ‘या’ 5 गोष्टी; ठरतात प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा
हिंदु धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपलं घर कसं असाव? कोणत्या दिशेला असावं? याचे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जवळ चुकूनही असता कामा नये,

कुठल्याही व्यक्तीसाठी त्याचं घर हेच त्याच्यासाठी सर्व काही असतं. घरात त्याला शांती मिळते, आपल्या कुटुंबातील व्यक्तींमुळे आनंद मिळतो, समाधान मिळतं. हिंदु धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपलं घर कसं असाव? कोणत्या दिशेला असावं? याचे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जवळ चुकूनही असता कामा नये, त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो, जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं?
कचराकुंडी – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा समोर कचराकुंडी नसावी, किंवा कचरा पडलेला नसावा, तुमच्या घरासमोरच जर घाण असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये बाधा ठरते. तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
झाडं – तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर जर झाडं असतील तर ते अशुभ मानलं जातं, कारण ते तुमच्या प्रगतीमधील अडथळा मानला जातो. त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाडं नसावेत असं वास्तुशास्त्र सांगतं.
चिखल – तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर चिखल नसावा, किंवा दलदल नसावी, यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं.
विद्युत पोल – घराच्या मुख्य दरवाजासमोर विद्युत पोल नसावेत असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे, जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर वि्युत पोल असेल तर तुमच्या घरामध्ये भाडंणं आणि वादविवाद होतात.
पायऱ्या – तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा समोर पायऱ्या नसाव्यात असंही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. घराच्या समोर जर पायऱ्या असतील तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुमच्या घरासमोर जर पायऱ्या असतील तर त्या तुमच्या प्रगती आणि यशामध्ये अडथळा ठरततात, त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पायऱ्या नसाव्यात असं म्हटलं जातं. तुमचं घर कसं असावं? याबाबत वास्तुशास्त्रात माहिती सांगितलेली आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
