Vastu Tips : वास्तूदोष दूर करण्यासाठी असा करा फुलांचा वापर, हे उपाय बनवू शकतात मालामाल

रागावलेल्या मैत्रिणीच्या गालावर हसू फुलवण्यापासून ते ते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक बाबतीत फुलं ही महत्वाचा दुवा असतात. ही फुले घरातील अनेक वास्तू दोष दूर करण्यासाठी  प्रभावी ठरतात.

Vastu Tips : वास्तूदोष दूर करण्यासाठी असा करा फुलांचा वापर, हे उपाय बनवू शकतात मालामाल
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 11:05 PM

मुंबई : फुलांचा भारताच्या संस्कृतीशी खूप जुना संबंध आहे. पूजेपासून कवींच्या कवितांपर्यंत सर्वत्र फुलांचा उल्लेख होतो. रागावलेल्या मैत्रिणीच्या गालावर हसू फुलवण्यापासून ते ते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक बाबतीत फुलं ही महत्वाचा दुवा असतात. ही फुले घरातील अनेक वास्तू दोष दूर करण्यासाठी  प्रभावी ठरतात. वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते फुलांशी संबंधीत असे काही उपाय आहेत  ज्यामुळे आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारू शकते. फुलांचा वापर करण्यापूर्वी त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे नियम समजून घ्या.

घराच्या उत्तर दिशेला जास्वंदाच्या फुलाचे झाड लावा

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की घरात लाल जास्वंदाच्या फूलाचे झाड  लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र संचारते. जास्वंदाचे फूल आई भवानी आणि गणेशाला खूप प्रिय आहे. घरामध्ये जास्वंदाचे झाड लावताना लक्षात ठेवा की ते नेहमी उत्तर दिशेला लावावे.

चमत्कारीक आहे कमळाचे फूल

हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांना कमळाचे फूल धरलेले दाखवले आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही कमळाचे फूल धारण करतात, तर माता सरस्वती आणि भगवान ब्रह्मदेवाचे आसन केवळ कमळाचे फूल आहे. घरामध्ये कमळाच्या फुलाचे रोप लावल्याने घरामध्ये आर्थिक समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

हे सुद्धा वाचा

प्रेमाचे प्रतीक आहे गुलाब

प्रेमात पडलेले लोकं अनेकदा गुलाबाच्या फुलांनी आपले प्रेम व्यक्त करतात. पूजेतही गुलाबाच्या फुलांचा वापर केला जातो.  नैऋत्य दिशेला गुलाबाचे फूल लावल्याने घरात सुख-समृद्धी राहते. याशिवाय गुलाब घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो.

पळसाचे फुलं आहेत फारच प्रभावी

जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तर त्याने पळसाच्या फुलाचा विशेष उपाय करावा, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. पळसाचं फूल व नारळ पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे असलेल्या ठिकाणी ठेवावं. असं केल्यानं तुमचं आर्थिक संकट लवकरच दूर होईल. हा एक उपाय केल्याने घरात धनाची कमतरता भासणार नाही. पळसाची ताजी फुलं न मिळाल्यास त्याची वाळलेली फुलंही वापरता येतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.