AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मोरपंखाच्या या उपायांनी होतील आर्थिक समस्या दूर, जुळून येईल धनलाभाचे योग

घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी शास्त्रामधेय विविध उपाय सांगण्यात आले आहेत. काही उपाय मोराशीसुद्धा संबंधित आहेत. श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर मोरपंख धारण केलेले असतात. यामुळे मोरपंख अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानला जातो.

Vastu Tips : मोरपंखाच्या या उपायांनी होतील आर्थिक समस्या दूर, जुळून येईल धनलाभाचे योग
मोरपंखImage Credit source: Social Media
| Updated on: May 27, 2023 | 4:54 PM
Share

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) मोराचे पंख अत्यंत शुभ मानले जातात. बरेच जण ते घरी ठेवतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व मन प्रसन्न राहते. हिंदू मान्यतेनुसार, श्रीकृष्णाने डोक्यावर मोराची पिसे धारण केली होती, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात मोरपंख अर्पण केल्याने जीवनात यश मिळते, अशी धार्मीक मान्यता आहे.

मोरपंखाचे उपाय

  • घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषचे विविध दोष दूर होऊ शकतात. मोरपंख घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तच्या दृष्टीस पडेल अशाठिकाणी ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती वाढते.
  • घर किंवा बेडरूमच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला मोरपंख लावावा. काही दिवसानंतर याचे सकारात्मक फळ दिसून येईल. या दिशेला मोरपंख लावल्याने घराची बरकत वाढते.
  • जो व्यक्ती नेहमी आपल्या जवळपास मोरपंख ठेवतो, त्याचे राहू दोष कमी होतात.
  • आकर्षण वाढवण्यासाठी मोरपंख पाकिटात किंवा खिशामध्ये ठेवावा.
  • सरस्वती देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ मोरपंख ठेवावा. याच्या शुभ प्रभावाने ज्ञान वाढते आणि परीक्षेत यश प्राप्त होते.

मोरपिस कोणत्या दिशेला ठेवावीत

घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मोराची पिसे ठेवणे शुभ मानले जात असले तरी घराच्या आग्नेय दिशेला मोराची पिसे ठेवल्याने नेहमी आशीर्वाद मिळतात.

वास्तुदोषावर कोणता उपाय करावा

जर घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रानुसार बांधला नसेल तर त्यावर तीन मोराची पिसे लावावीत आणि खाली गणपतीचे चित्र लावावे. याने वास्तुदोष संपतो.

सुखी वैवाहीक जीवनासाठी

वैवाहिक जीवनातील भांडणे थांबण्याचे नाव घेत नसतील तर तुम्ही हे उपाय करू शकता. घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.