AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijaya Ekadashi 2025: विजया एकादशीच्या दिवशी पूजाच्या थाळीमध्ये ‘या’ गोष्टी नक्की ठेवा…

Vijaya Ekadashi Vrat: हिंदू धर्मामध्ये एकादशी महत्त्वाची मानले जाते. विजया एकादशी हा दिवस भगवान विष्णूला समर्पित एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. विजया एकादशीचे व्रत केल्याने विरोधकांवर विजय मिळतो आणि जीवनात यश मिळते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता येते.

Vijaya Ekadashi 2025: विजया एकादशीच्या दिवशी पूजाच्या थाळीमध्ये 'या' गोष्टी नक्की ठेवा...
| Edited By: | Updated on: Feb 22, 2025 | 3:40 PM
Share

हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. विजया एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानची पूजा केली जाते. प्रत्येकवर्षी महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशीचे व्रत पाळले जाते. विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या कामामध्ये प्रगती होईल. तुमच्या कामाामध्ये अडथळे येत असतील आणि महत्त्वाच्या गोष्टी लांबणीवर जात असतील तर विजया एकादशीचे व्रत तुम्ही केले पाहिजेल. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे तुमच्या विरोधींवर तुम्ही मात करू शकता. या व्रताच्या दिवशी फळाचे सेवन केल्यामुळे तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

विजया एकादशीच्या दिवशी तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा. असे केल्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरात आणि आयुष्यात सुख समृद्धी मिळते. पंचांगानुसार, विजया एकादशी तिथी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:56 वाजता सुरू होईल आणि एकादशी तिथी 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:45 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, विजया एकादशाचे व्रत 24 तारखेलाच पाळले जाईल.

विजया एकादशीच्या दिवशी पूजा थाळीमध्ये ‘या’ गोष्टींचा समावेश करा

भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र – भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी त्यांची मूर्ती किंवा चित्र ठेवणे आवश्यक आहे.

पिवळी फुले – भगवान विष्णूंना पिवळी फुले आवडतात. म्हणून, पूजा थाळीत पिवळी फुले ठेवा.

फळे आणि मिठाई – पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूला फळे आणि मिठाई अर्पण करा.

तुळशीची पाने – तुळशीची पाने भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत. म्हणून, पूजा थाळीत नेहमी तुळशीची पाने ठेवा.

दिवा आणि धूप – भगवान विष्णूच्या आरतीसाठी दिवा आणि धूप लावा.

पंचामृत – पंचामृत भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. म्हणून, पूजा थाळीत पंचामृत ठेवा.

धूप – भगवान विष्णूच्या आरतीसाठी धूप जाळा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

नारळ – विजया एकादशीच्या दिवशी नारळाला विशेष महत्त्व आहे. पूजा थाळीत नारळ ठेवणे शुभ मानले जाते.

विजया एकादशीच्या दिवशी योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी मिळण्यास मदत होते ज्यामुळे तुमची प्रगती होते.

विजया एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी करा विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर भगवान विष्णूसमोर मंत्र जप करा. भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा चित्राला गंगाजलाने स्नान घाला आणि त्यांना पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करा दिवा आणि धूप लावा आणि आरती करा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा. या दिवशी निर्जल किंवा फळरहित उपवास पाळला जातो. जर ते शक्य नसेल तर दिवसातून एकदा सात्विक अन्न खाऊ शकतो. भगवान विष्णूंचे स्तोत्राचे रात्रभर पठण करा. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करा, पूजा करा आणि ब्राह्मणांना जेवण द्या. यानंतर, उपवास सोडा. विजया एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण आणि मांस यासारखे तामसिक अन्न खाऊ नका. या दिवशी ब्रह्मचर्य पाळा आणि खोटे बोलू नका. तसेच, कोणालाही अपशब्द वापरू नका. विजया एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.