दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त VIP मोशन पिक्चर्सने बनवले थीम साँग
आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस 6 जुलै रोजी पार पडला. या खास दिवशी त्यांच्यावर एक गाणही तयार करण्यात आलं आहे.

आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस 6 जुलै रोजी पार पडला. यावेळी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला भारत सरकारचे काही अधिकारीही उपस्थित होते. या खास कार्यक्रमानिमित्त दलाई लामा यांच्यावर एक गाणंही तयार करण्यात आलं आहे. विकास पराशर यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
विकास पराशर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, व्हीआयपी मोशन पिक्चर्ससाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण, दलाई लामा यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त थीम सॉन्ग सादर करताना आम्हाला खूप सन्मान वाटत आहे. ते शांती, करुणा आणि ज्ञानाचे प्रतिक आहेत.
विकास पराशर यांनी पुढे लिहिले की, या विशेष गाण्याच्या निर्मितीसाठी परमपूज्य दलाई लामाजी आणि आदरणीय तिबेटीयन इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (TIPA) सोबत काम करणे हा व्हीआयपी मोशन पिक्चर्ससाठी एक आशीर्वाद आहे. हे गाणे तयार करणे आमच्या शिरपेचात फक्त एक तुरा नाही तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा क्षण आहे, हा क्षण आमच्या कायम स्मरणात राहील.
कोण आहेत दलाई लामा?
दलाई लामा हे एक ब्रह्मचारी भिक्षू आहेत जे तिबेटी बौद्ध धर्माच्या गेलुक्पा पंथाचे प्रमुख आहेत. ते तिबेटचे राजकीय नेते देखील आहेत. दलाई लामा यांना एक बोधिसत्व अवलोकितेश्वराचा अवतार मानले जाते. दलाई लामा हे शांतीचे प्रतीक आहेत. तिबेटच्या मुक्तीसाठी अहिंसक संघर्ष केल्याबद्दल त्यांना 1989 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
