तुमची आवडती आईस्क्रीम कोणती?; जाणून घ्या, राशी आणि त्यांच्या आवडत्या आईस्क्रीम

आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणता आईस्क्रीमचा फ्लेवर खायला हवे, याची माहिती देणार आहोत. (Ice Cream flavor according to zodiac sign)

तुमची आवडती आईस्क्रीम कोणती?; जाणून घ्या, राशी आणि त्यांच्या आवडत्या आईस्क्रीम
Namrata Patil

|

Apr 18, 2021 | 10:27 PM

मुंबई : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना त्यातून तात्पुरत्या स्वरुपात सुटका मिळण्यासाठी आपण थंड पदार्थ खातो. यात सर्वांच्या आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम….लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण आईस्क्रीमचे शौकीन असतात. यात कितीही कॅलरीज असल्या तरीही अनेक फिटनेस फ्रीक लोकही अनेकदा मोठ्या चवीने खातात. (What Ice Cream You Should try according to your zodiac sign)

चॉकलेट, व्हेनिला, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, मँगो याशिवाय अनेक आईस्क्रीमचे फ्लेवर्स बाजारात उपलब्ध असतात. काहींना चॉकलेट, तर काहींना स्ट्रॉबेरी, तर काहींना मिक्स फ्रूट यासारखे विविध आईस्क्रीमचे फ्लेवर्स खायला आवडतात. पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणता आईस्क्रीमचा फ्लेवर खायला हवे, याची माहिती देणार आहोत.

मेष

मेष राशीत जन्मलेले लोक फार आकर्षक आणि उत्साही असतात. ते नेहमी विविध प्रयोगासाठी तयार असतात. त्यामुळे या व्यक्तींच्या आवडत्या आईस्क्रीममध्ये पुदीन्याचा स्वाद असावा. जे मेष राशीतील व्यक्तींप्रमाणेच ताजेतवाने असते.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्ती आरोग्याप्रती फार जागरुक असतात. ते नेहमी दर्जेदार खाणं पसंत करतात. त्यामुळे या व्यक्तींच्या आवडत्या आईस्क्रीममध्ये ग्रीन टीची चव असावी. यामुळे ती व्यक्ती युनिक असल्याचे स्पष्ट होते.

मिथुन

मिथुन राशीची लोक फार साहसी आणि उत्साही असतात. ते विनाकारण कुठेही भटकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आईस्क्रीम ही फळांची असते. कारण ती स्वादिष्ट आणि सर्व प्रकारांनी परिपूर्ण असते.

कर्क 

कर्क राशीच्या व्यक्तींना घरातल्या कामाशी बांधलेले असतात. त्यांना आरामदायक किंवा उबदार गोष्टी आवडतात. त्यांना प्रयोग करणे अजिबात आवडत नाही. या व्यक्तींसाठी चॉकलेट चीप हे आईस्क्रीम चांगले मानले जाते. या व्यक्ती स्वभावाने फार पारंपारिक असतात.

सिंह

सिंह राशीचे व्यक्ती चमकदार आणि मसाल्यासारखे असतात. ते बोल्ड, लाऊड आणि आकर्षित असतात. ते कोणतेही काम सहज करतात. त्यामुळे त्यांनी नारंगी चवीचा आईस्कीम खाल्ला पाहिजे. ते आईस्क्रीम चवीला ताजे आणि गोड लागते.

कन्या

कन्या राशीच्या लोक हे जुन्या विचारांचे लोक आहेत. त्यांच्यासाठी सर्वोत्तम आईस्क्रीम चव ही आंब्याची असते. आंब्याचा आईस्क्रीम क्लासिक आणि हलका असतो.

तूळ 

व्हेनिला फ्लेवरचा आईस्क्रीम सर्वांनाचा आवडतो. तूळ राशीचे व्यक्ती नेहमीच इजी गोईंग असतात. ते आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक वृत्तीचे असल्याने त्यांना व्हेनिला फ्लेवरचा आईस्क्रीम खाणे प्रचंड आवडते

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्ती रहस्यमय व्यक्तिमत्त्वाच्या असतात. ते स्वत:ला फार व्यवस्थित ठेवतात. या राशींच्या व्यक्तींसाठी डार्क चॉकलेट हा आईस्क्रीमचा फ्लेवर सर्वोत्कृष्ट ठरतो. कारण ते चवीला फार उत्तम असते.

धनु 

धनु राशीचे लोक फार मजेदार आणि साहसी असतात. त्यांना शेंगदाणे किंवा ड्रायफूटचे आईस्क्रीम आवडते.

मकर 

मकर राशीची लोक साधे आणि पारंपारिक असतात. त्यांना क्लासिक गोष्टी फार आवडतात. त्यामुळे या राशीचे बहुतांश लोक हे व्हॅनिला फेल्वर्सचा आईस्क्रीम खातात. या राशीचे व्यक्तींचा स्वभाव सरळ, बिनधास्त असतो.

कुंभ 

कुंभ राशीचे लोक अपारंपरिक आहेत. त्यांना गर्दीत जाणे अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या आवडीचा आईस्क्रीम लिंबाच्या फ्लेवर्सचा असतो.

मीन 

मीन राशीत जन्मलेले लोक सौंदर्यशास्त्र आणि रचनात्मक असतात. त्यांना आईस्क्रीम वाईल्ड कॉम्बिनेशन पद्धतीचा फ्लेवर् आवडतो. या आईस्क्रीमचा स्वाद नियोपॉलिटन आहे. (What Ice Cream You Should try according to your zodiac sign)

संबंधित बातम्या : 

Horoscope 18th April 2021 : कोणत्या राशींवर सूर्यदेव प्रसन्न? कोणत्या राशीच्या लोकांवर आरोग्याचं संकट? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Zodiac Signs | ‘या’ चार राशी मानसिकदृष्ट्या कमजोर आणि अस्थिर असतात, तुमची तर राशी नाही ना यामध्ये?

Lakshmi Panchami 2021 | लक्ष्मी पंचमीच्या दिवशी या प्रकारे करा पूजा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें