पुत्रदा एकादशीच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नये….
Putrada Ekadashi Upay: पुत्रदा एकादशीचे व्रत हे संतती प्राप्तीसाठी केले जाते, जे ५ ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी काही गोष्टी करणे निषिद्ध मानले जाते. असे म्हटले जाते की जर ते पाळले नाहीत तर उपवासाचे कोणतेही फळ मिळत नाही.

हिदू धर्मामध्ये एकादशीला विषेश महत्त्व दिले जात. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हिंदू कॅलेंडरनुसार, पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा साजरी केली जाते, एकदा पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात येत असल्याने पुत्रदा एकादशी व्रताचे महत्त्व आणखी वाढते. दरवर्षी, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला, म्हणजेच या वेळी ५ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी व्रत केले जाते. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या व्रतामुळे मुलाचा जन्म होतो, मुलांच्या सुखातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप खास आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही विशेष पद्धतीनं पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि पूर्ण भक्तीने आणि नियमांचे पालन करून पूजा करतात. धार्मिक शास्त्रांमध्ये अशी काही कामे सांगितली आहेत, जी या एकादशी दरम्यान करू नयेत. असे मानले जाते की ही कामे केल्याने उपवासाचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.
पुत्रदा एकादशीला काय करू नये?
खोटे बोलू नका – हे एकादशी व्रत सत्य आणि पवित्रतेचे प्रतीक आहे, म्हणून उपवास करताना खोटे बोलू नये.
तामसिक अन्न निषिद्ध आहे – पुत्रदा एकादशीच्या व्रतामध्ये लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी, मद्य इत्यादी तामसिक अन्न खाऊ नका.
रागावणे टाळा – एकादशीच्या व्रतामध्ये स्वतःला शांत, संयमी आणि सकारात्मक ठेवा. तसेच, भांडणे किंवा वादविवादांपासून दूर रहा.
दिवसा झोपू नका – एकादशीच्या दिवशी झोपल्याने उपवासाचे पुण्य कमी होते, अशी धार्मिक मान्यता आहे, म्हणून उपवासाच्या वेळी झोपू नका.
अपमान करू नका – एकादशीच्या उपवासात एखाद्याचा अपमान करणे किंवा त्याचे वाईट बोलणे उपवासाचा परिणाम कमी करू शकते, म्हणून या कृतींपासून दूर रहा.
तुळशी तोडू नका – एकादशी तिथीला तुळशी तोडणे निषिद्ध मानले जाते, म्हणून पुत्रदा एकादशीच्या व्रताला तुळशीची पाने तोडू नयेत.
नखे आणि केस कापू नका – एकादशीला नखे आणि केस कापणे अशुभ आहे, म्हणून असे करणे टाळा. तसेच, एकादशीला दाढी करू नये.
